शहापूर (बातमीदार): कसाऱ्यातील शाळेला ५१ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शिवजयंतीचे औचित्य साधत रक्तदान शिबिर तसेच ज्येष्ठ शिवसेना
शिवसैनिकांचा सत्कार ठाकरे गटाकडून करण्यात आला. शिवसेना तालुका संघटक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी कसारा येथील शिवसेना शाखेच्या स्थापनेपासून जनतेच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र झटणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकांचा मान्यवरांच्या उपस्थित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख कुंदन पाटील, उपनेते विश्वास थळे, उपजिल्हाप्रमुख शंकर खडे, जिल्हा नेत्या रश्मी निमसे, माजी जि.प.अध्यक्ष मंजूषा जाधव, तालुकाप्रमुख कुलदीप धानके, तालुका संघटक चंद्रकांत जाधव, उपतालुकप्रमुख भाई देहेरकर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.