मुंबई

सजावटीसाठी बांबूच्या वस्तू भारी

CD

डोंबिवली, ता. १८ (बातमीदार) : घराची सजावट, तसेच ढाबा आणि हॉटेलमधील अंतर्गत सजावटीसाठी बांबूपासून बनवलेल्या विविध वस्तूंचा वापर करण्याचे प्रमाण काही महिन्यांपासून वाढल्याचे दिसत आहे. सजावटीसह वापरासाठी बांबूच्या वस्तूंचा वापर करणे हा सध्या ट्रेण्ड बनत चालला आहे. त्यामुळे या बांबूच्या वस्तू विकणाऱ्यांची कल्याण पश्चिमेकडील परिसरात दुकाने थाटली आहेत.
घरासह ढाब्यांमध्ये हटके लूक देण्यासाठी बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. पूर्वी भाजीपाला व इतर वस्तू ठेवण्यासाठी किंवा नेण्यासाठी बांबूच्या टोपल्यांना मागणी होती. कारण त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता. काही वर्षांत बांबूपासून तयार करण्यात येणाऱ्या वस्तूंचीही सजावटीसाठी मागणी वाढली आहे. सजावटीचा वापर फक्त घरांपुरता मर्यादित राहिला नाही. बांबूपासून बनवलेल्या वस्तू या पर्यावरणपूरक असतात. त्याचबरोबर त्या बराच काळ टिकतात.

बांबूपासून तयार केलेला पाळणा, लॅम्परोइस, आइस्क्रीम कोन, सूप, टोपल्या, पंखा, झाडू आदी वस्तूंना ग्राहकांकडून मागणी आहे. या वस्तू टिकायला चांगल्या आणि मजबूत असल्याने ग्राहकांची मागणी वाढली आहे. घरात भाजीपाला, फळे तसेच भाकरी ठेवण्याबरोबरच बांबूच्या वस्तूंना मागणी आहे. मनमाड, सोलापूर, पुणे, कर्जत, मुरबाड आदी शहरांतून कच्चा तसेच तयार माल आणून त्याची या ठिकाणी विक्री केली जाते

वस्तूंचे दर (रुपयांत)
पाळणा ... ७००
सूप ... १०० ते २५०
टोपल्या ... ६० ते ३५०
पंखा ... ९०
झाडू ... ५० ते २००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Today: पेट्रोल-डिझेल महागल्यानंतर LPG गॅसचे नवे दर जाहीर; मुंबई-पुणेसह आता राज्यभरात गॅस सिलेंडर किती रुपयांना?

Akshay SL: LIVE मॅचमध्ये अचानक छातीत कळ अन् कर्नाटकच्या माजी खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू

Latest Jobs : काम न करता मिळणार 3.7 कोटी रुपये पगार? OpenAI ने आणली अशी नोकरी, जाणून मोठमोठ्या इंजीनियर्सचं डोकं चक्रावलय

सरकारी रुग्णालयात खासगी लॅबचा सुळसुळाट; कमिशनखोर प्रशासनाचा वरदहस्त, रुग्णांची लूट

Nashik: गुरुजींना ५ लाखांपर्यंत कॅशलेस आरोग्य संरक्षण, वैद्यकीय बिले प्रतिपूर्ती बंद; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT