मुंबई

बेबेकायदा बांधकामांना कर आकारू नये

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १८ : कल्याण-डोंबिवली हद्दीतील बेकायदा बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर असल्याने पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी या बांधकामांना आळा घालण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. प्रभागांमध्ये यापुढे एकही बेकायदा बांधकाम उभे राहू नये, याची विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना पालिका अधिकाऱ्यांना आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यासोबतच यापुढे बेकायदा बांधकामांना कोणत्याही प्रकारची कर आकारणी केली जाऊ नये, अशी सूचनाही केली आहे. मालमत्ता कर विभाग आणि प्रभाग स्तरावरील सर्व सहाय्यक आयुक्तांना या संबंधी आदेश नुकतेच देण्यात आले आहेत.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत बेकायदा बांधकामे मोठ्या प्रमाणात उभी आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्ते संदीप पाटील यांच्या याचिकेवरून डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले आहेत. या बेकायदा इमारतींमध्ये घर घेतलेल्या नागरिकांची खरेदीत बनावट कागदपत्रांमुळे फसवणूक झाली आहे. येथील रहिवासी पालिका हद्दीतील रस्ते, पाणी, वीज आणि इतर नागरी सुविधांचा लाभ घेतात. त्यामुळे या बेकायदा इमारतींमधील सदनिकांना मालमत्ता कर लावण्याचे आदेश तत्कालीन आयुक्तांनी मालमत्ता कर विभागाला दिले होते.
पालिका आयुक्त डॉ. जाखड यांनी पालिका हद्दीत एकही नवीन बेकायदा बांधकाम उभे राहणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्तांना केल्या आहेत. त्यांना कर लावला नाही, तर अशा बांधकामांना आळा घालणे शक्य होईल. नागरिकांची घर खरेदीत होणारी फसवणूक टळेल, असा विचार करून आयुक्तांनी बेकायदा बांधकामांना कर लावून नयेत, अशा सूचना केल्या आहेत. एका लाखापेक्षा अधिक कर योग्य मूल्य असलेल्या कोणत्याही इमारतीला कर (ए विंग, बि विंग) आकारणी करू नये, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

करपावत्या म्हणजे अधिकृतचा पुरावा
बेकायदा इमारतींना पालिकेकडून मालमत्ता कर लावण्यात येत असल्याने या मालमत्ता करपावत्यांचा उपयोग रहिवासी विविध शासकीय कामांसाठी, सदनिका अधिकृत असल्याचा पुरावा म्हणून करतात. कर आकारणी होत असल्यामुळे महापालिकाच अशा बांधकामांची पाठराखण करते की काय, असे चित्र उभे राहिले आहे. उच्च न्यायालयाने अशा बांधकामासंबंधी कठोर आदेश दिल्याने सध्या मुंबई महानगर प्रदेशात सर्वत्रच स्थानिक स्वराज्य संस्थांकडून बेकायदा बांधकामांविरोधात कारवाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर डाॅ. जाखड यांचे आदेश महत्त्वाचे मानले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'अजूनही धडा घेतला नाही...'; NEET पेपर लीकवर NTA ला फटकारत सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि CBI ला नोटीस

Kothrud fraud Case : कोथरूडमध्ये फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने भागीदाराला अडीच कोटींचा गंडा; आर. के. लाईफस्पेस डेव्हलपर्सवर गुन्हा

Yewalewadi Murder Case: येवलेवाडीत चारित्र्यावर संशय घेऊन पतीकडून पत्नीचा गॅस टाकीने खून

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरण; पुण्यातील आणखी प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर

'ही कास्टिंग पटलच नाही!' वरुण धवनच्या चित्रपटात १ वर्षांनी मोठी अभिनेत्री बनली त्याची आई, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT