मुंबई

कचरावाहक डम्‍परमुळे प्रदूषणाचा धोका

CD

कचरावाहक डम्‍परमुळे प्रदूषणाचा धोका
मुलुंड डम्पिंग ग्राउंड परिसरात धूळ; आरोग्‍यावर परिणाम
मुलुंड, ता. १८ (बातमीदार) ः मुलुंड डम्पिंग ग्राउंडवरून कचरा वाहून नेणाऱ्या डम्‍परमुळे प्रदूषणात लक्षणीय वाढ झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागले आहेत. पालिका प्रशासनाने प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पूर्व द्रूतगती मार्गावर जमा झालेला मातीचा थर डम्‍पर व इतर वाहनांमुळे हवेत उडून वाहनचालकांना त्रास हाेतो. तोंडावर रुमाल ठेवूनच शाळकरी मुले आणि वयोवृद्ध नागरिकांना दररोज या रस्‍त्‍यावरून जावे लागते. पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्‍याचा स्‍थानिकांचा आरोप आहे.
दररोज ४०० डम्‍पर गाड्या मुलुंड डम्पिंग ग्राउंडवरून कचरा वाहून नेतात. मुलुंड पूर्वच्या म्हाडा कॉलनीतून उड्डाणपुलाखालून ठाण्याच्या दिशेने कचरा नेला जातो. त्‍यामुळे मुलुंड डम्पिंग ग्राउंड, म्हाडा कॉलनी आणि टोलनाकादरम्यान दीड किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर मातीचा थर जमा होतो. डम्‍पर व इतर गाड्यांमुळे हा मातीचा थर हवेत उडतो. स्थानिक नागरिकांना यामुळे भयंकर धुळीचा सामना करावा लागतो. कचरा व्यवस्थापनाचे कंत्राट घेतलेल्या ठेकेदाराला रस्त्यावर पसरणाऱ्या कचऱ्याची साफसफाई करण्याची जबाबदारी दिली होती. कंत्राटदाराचे याकडे दुर्लक्ष होत असल्‍याचे स्‍थानिकांचे म्‍हणणे आहे. पूर्व द्रूतगती मार्गालगत राहणाऱ्या नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास होतो.
वाहतुकीच्या नियमानुसार, अवजड वाहनांमध्ये क्लीनर असणे आवश्यक आहे, पण कंत्राटदाराच्या डम्‍परमध्ये क्लीनर नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे वाहतूक विभाग आणि पालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी स्‍थानिकांनी केली आहे.
मुलुंड डम्पिंग ग्राउंडची कचरा साठवण क्षमता ७० लाख मेट्रिक टन आहे. ठेकेदाराला या कचऱ्याच्या विल्हेवाटीचा कंत्राट सहा वर्षांसाठी देण्यात आला आहे. कोविडच्या काळात या कंत्राटाची मुदत वाढवण्यात आली आणि जून २०२५ पर्यंत कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. पालिकेने यासाठी ५५८ कोटी रुपयांचा करार केला आहे, मात्र आतापर्यंत फक्त ३५ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली गेली आहे. प्रत्येक वर्षी किमान १२ लाख मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे उद्दिष्ट असून, ते पूर्ण झालेले नाही.

ईशान्य मुंबईत मुलुंड, कांजुरमार्ग आणि देवनार येथील डम्पिंग ग्राउंडमुळे आरोग्याच्या समस्‍या वाढल्‍या आहेत. प्रदूषणात वाढ झाल्याने मी संसदेत याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मुलुंड डम्पिंग ग्राउंडप्रकरणी मुंबई पालिका आयुक्तांनी संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी. पालिका प्रशासनाने तत्काळ या समस्येचा निपटारा करावा अन्यथा आम्हाला पालिकेविरोधात जनआंदोलन छेडावे लागेल.
संजय दीना पाटील,
खासदार, ईशान्य मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT