मुंबई

एपीएमसीत कांदा स्वस्तात मस्त

CD

तुर्भे, ता. १८ (बातमीदार) : रोजच्या वापरात अत्यावश्यक असणाऱ्या कांद्याचे भाव कमी झाल्याने गृहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मागील काही महिने कांद्याचे सरासरी भाव २५ ते ३५ रुपयांच्या वर पोहोचले होते; मात्र आता आवक वाढल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजारात भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. मागील आठवड्यापासून १० ते १५ रुपयांनी प्रतिकिलो कांद्याची विक्री होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
मागणीच्या तुलनेत लाल आणि पांढऱ्या कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम म्हणून भाव कमी होत आहे. बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी ३० ते ४० रुपयांपर्यंत भाव मिळत होता; मात्र आठवड्यापूर्वी भाव १५ ते २० रुपये प्रतिकिलो झाला आहे. मंगळवारी (ता. १८) वाशी एपीएमसीत ५१ ट्रक, ६१ टेम्पो अशा ११२ वाहनांची आवक झाली आहे. यामध्ये २५ हजार ९९० गोणी कांदा आहे. ही आवक नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगलीमधून झाली आहे. महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांहून अधिक कांद्याचे उत्पादन वाढले असल्याने भाव कमी होण्याची शक्यता आहे. हे भाव १५ एप्रिलपर्यंत असेच राहणार असून, आता जुना साठवणीतला कांदा बाजारात लवकरच दाखल होणार असल्याने भाव आणखी उतरण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवली जाते.

--------------
मंगळवारची आवक
ट्रक ५१
टेम्पो ६१
गोणी २५,९९०
----------------
शेतकरी चिंतेत
सध्या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक वाढत आहे. आवक वाढत असल्याने किंमत कमी होऊ लागली आहे. दरम्यान, दररोज किमती कमी होत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आठवडाभरात आठ ते दहा रुपयांनी प्रतिकिलो भाव कमी होत असून, आणखी आवक वाढल्यास आगामी काळात कांद्याचे भाव आणखी कमी येण्याची शक्यता आहे.
-------------
उन्हाळी कांद्याची साठवण
उन्हाळी कांदा हा आठ महिने टिकण्याची क्षमता असल्याने मोठे व्यापारी उन्हाळी कांदा स्वस्त किमतीमध्ये घेऊन साठवण करून ठेवतात. यासाठी तेच व्यापारी कांद्याची किंमत कमी करून शेतकऱ्याकडून माल विकत घेतात. वर्षभरात शेतकरी तीन वेळा कांदा उत्पादन घेत असतात; मात्र हिवाळी कांदा हा टिकण्याची क्षमता कमी आणि त्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्याचा साठवण करू शकत नाही.
----------------
उन्हाळी कांदा हा पुढील आठ महिने चांगला राहू शकतो. त्यामुळे साठवण केली जात असल्याने कांद्याची किंमत कमी होत आहे. जुना कांदा बाजारात आला की कांद्याच्या भावात आणखी घसरण होऊ शकते.
- दिगंबर राऊत, घाऊक व्यापारी, एपीएमसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport Threat : पुणे विमानतळावर हाय अलर्ट! गुवाहटीला जाणाऱ्या विमानात आढळली धक्कादायक चिठ्ठी, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, तपास सुरू

Marathi literature decade review : ‘दशकातले लेखक’; २०१०-२०२० मधील मराठी साहित्यप्रवाहाचा सखोल वेध

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; माझ्या घातपाताचा प्रयत्न कुणी केला?

Prize Money: IPL 2026 चा विजेता होणार मालामाल! चॅम्पियन संघाला मिळणार 'इतके' कोटी रुपये, तर उपविजेत संघालाही मिळणार 'इतके' कोटी

Mumbai Goa Highway Accident: ट्रकवर मोटार आदळून अहिल्यानगरच्या माय-लेकी ठार; मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ अपघात, बाप-लेक जखमी

SCROLL FOR NEXT