नवी मुंबई, ता. १८ (वार्ताहर) : नेरूळ सेक्टर चारमधील रसोई बार अँड रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या एका वेटरने बार बंद झाल्यानंतर पहाटेच्या सुमारास पाच लाखांची रोख रक्कम व मोबाईल फोन चोरून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. नेरूळ पोलिसांनी या चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चोराचे नाव छोटुकुमार रामचंद्र सिंग असे असून, तो नेरूळ सेक्टर चारमधील रसोई बार अँड रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करत होता. रविवारी रात्री बार बंद झाल्यानंतर पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास वेटर छोटुकुमार याने बारमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्याने बारमधील कॅश काउंटर फोडून त्यातील पाच लाख रुपये, तसेच जुने वापरते मोबाईल फोन चोरून नेले. सोमवारी सकाळी बार उघल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास आले. बारमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केल्यानंतर त्यात बारमध्ये काम करणारा छोटुकुमार याने पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास चोरी केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर बारचालक जयप्रकाश शेट्टी याने नेरूळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.