"आता त्याचे हातच बांधावे लागतील!" शुभमन गिल IPL 2026 Final आधी कोणाबद्दल असं बोलला?

Shubman Gill Jokes About Taping Sai Sudharsan’s Hit-Wickets: शुभमन गिलच्या शतकी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला पराभूत करत आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात धडक मारली. यानंतर गिलने त्याच्यात संघसहकाऱ्याचे हात बांधणार असल्याचे म्हटले आहे.
Shubman Gill | GT vs RR | IPL 2026

Shubman Gill | GT vs RR | IPL 2026

Sakal

Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) गुजरात टायटन्सने शुक्रवारी (२९ मे) अंतिम सामन्यात धडक मारली. शुक्रवारी गुजरातने राजस्थान रॉयल्सला क्वालिफायर २ सामन्यात ७ विकेट्सने पराभूत केले आणि अंतिम सामना गाठला.

मुल्लनपूरला झालेल्या या सामन्यातील गुजरातच्या विजयात शुभमन गिल (Shubman Gill) आणि साई सुदर्शन (Sai Sudharsan) यांनी मोलाचा वाटा उचलला. या दोघांनी सलामीलाच दीडशतकी भागीदारी केली. पण त्यांची भागीदारी विचित्र पद्धतीने तुटली. याबाबत शुभमन गिलने सामन्यानंतर मात्र मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

Shubman Gill | GT vs RR | IPL 2026
GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com