नालासोपारा, ता. १८ (बातमीदार) : वसईतील वसंत नगरी मैदानावर सुरू असलेल्या मेळ्यात मित्रासोबत फिरायला गेलेल्या २१ वर्षीय तरुणाला विजेचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. १७) रात्री घडली आहे. याबाबत आचोळा पोलिस ठाण्यात आयोजक आणि पाळणा ऑपरेटरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑपरेटरला अटक केले आहे, तर आयोजक हा पसार झाला आहे.
हर्ष सैन (वय २१) हा तीन मित्रांसोबत मेळ्यात सोमवारी रात्री फिरायला गेला होता. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आकाश पाळणा खेळण्यासाठी गेलेल्या हर्षला लोखंडी प्रवेशद्वाराचा विजेचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आचोळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाळण्याचा ऑपरेटर विजय चौहान याला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या मेळ्याला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला होता. त्यानंतरही वसई-विरार महापालिकेने परवानगी दिली. आता ही घटना घडल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या तरुणाच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा प्रश्न विचारला जात आहे.
नियमांनुसार परवानगी
अटी-शर्थी टाकून वरिष्ठ कार्यालयातून या मेळ्याला परवानगी दिली होती. आयोजकांनी दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे होते. त्याठिकाणी सर्व सुरक्षा नियमांचे पालन करणे, हे आयोजकांची जबाबदारी आहे, पण त्यांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली आहे, असे महापालिकेच्या ड प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त अलका खैरे यांनी सांगितले.
वसंत नगरी हे मैदान रहिवासी वापरासाठी दिले आहे, मात्र महापालिका हे मैदान व्यावसायिक वापरासाठी देते, हे चुकीचे आहे. यामुळे मुलांना खेळायला मिळत नाही. महापालिका केवळ पैसे कमविण्याच्या नादात कुणालाही परवानगी देत आहे.
- जोसेफ वर्गीस,
सचिव, वसंत नगरी फेडरेशन
वसंत नगरी मैदान हे शहराच्या मध्यभागी आहे. या ठिकाणी मेळ्यांना वसई-विरार महापालिकेने परवानगी देऊ नये, अशी वारंवार मागणी करण्यात आली, मात्र प्रभाग समितीऐवजी महापालिकेच्या मुख्य कार्यालयातून १७ दिवसांची परवानगी घेतली होती. तरुणाच्या मृत्यूनंतर आयोजक आणि महापालिकेच्या संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा.
- रुपेश जाधव,
माजी महापौर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.