मुलुंडमध्ये अखेर पाणीपुरवठा सुरळीत
मुलुंड, ता. १८ (बातमीदार) ः मुलुंड पूर्वेकडील पीएमजीपी कॉलनीमध्ये असलेल्या नाल्यात रविवारी (ता. १६ ) सकाळी ७५० मिमी व्यासाची पाइपलाइन फुटल्याने पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. सोमवारी (ता. १७ ) रात्री उशिरा दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर आज (ता. १८) दुपारी १ वाजल्यापासून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
यासंदर्भात ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार रविवारी रात्रीपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला.
रविवारी सकाळपासून मुलुंड पूर्वेतील पाणीपुरवठा थांबला होता, मात्र पाइपलाइन फुटलेले ठिकाण शोधण्यात पालिकेच्या अधिकाऱ्यांना अडचणी येत होत्या. अखेर पीएमजीपी कॉलनीमध्ये नाल्याच्या खाली पाइपलाइन फुटल्याचे आढळून आले. खाडी परिसरात दलदल आणि कचऱ्याचा मोठा साठा असल्याने सफाई करण्यात आणि भरतीच्या पाण्यामुळे दुरुस्तीचे काम सुरू ठेवण्यात वेळ लागला. पालिकेचे ६०हून अधिक कर्मचारी तीन दिवस दुरुस्तीच्या कामात व्यस्त होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.