मुंबई

नवी मुंबईत हिवताप, डेंगी आजारांबाबत जनजागृती

CD

नवी मुंबईत हिवताप, डेंगी आजारांबाबत जनजागृती
वाशी, ता. १८ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्ये हिवताप, डेंगी आजाराचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमधून नागरिकांमध्ये हिवताप, डेंगी आजारांबाबत व डासउत्पत्ती स्थानांबाबत प्रभावीपणे जनजागृती करण्यात येत आहे.
नुकतेच नवी मुंबई महापालिकेकडून १३ ते १५ मार्च या कालावधीत श्री गुरु सिंग सभा-सिक्ख नानकशाही सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांकरीता विशेष हिवताप, डेंगी जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ४,३११ नागरिकांना हिवताप, डेंगी आजाराविषयी माहिती देण्यात आली. तसेच त्याच्या प्रतिबंधासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात आली. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे अ‍ॅनॉफिलीस व एडीस डासांची उत्पत्तीस्थाने प्रत्यक्षात दाखविण्यात आली. तसेच डासांच्या आळ्याही प्रत्यक्ष दाखविण्यात आल्या. त्याचप्रमाणे घराभोवती व घरांतर्गत होणारी डासोत्पत्ती स्थाने यांची प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. या वेळी पाणी साठवून ठेवलेले ड्रम हे ओढणी, धोतर किंवा साडीच्या कपड्याने बंदिस्त करणे, तसेच पाणी साठविण्याची भांडी व टाक्या बंदिस्त करणे, त्याचप्रमाणे आठवड्यातून एक दिवस पाणी साठविण्याची भांडी व टाक्या स्वच्छ करून कोरड्या ठेवणे, भंगार साहित्य व टायर्स इत्यादी नष्ट करणे, छतावरील प्लॅस्टिक शीट, ताडपत्री यामध्ये पाणी साचू न देणे आणि तापाची लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे याविषयी नागरिकांमध्ये जनजगृती करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune crime and politics: विषारी दारू, वाढते गुन्हे आणि बिघडलेली कायदा-सुव्यवस्था; पुणे पोलिस व राज्य सरकारवर सुप्रिया सुळे यांचा निशाणा

Loni Kalbhor crime news: विषारी रासायनिक ताडी प्रकरणात लोणी काळभोरमध्ये आई-मुलगा अटकेत; घातक स्फटिकांसह मुद्देमाल जप्त

Polytechnic Student Death : छ. संभाजीनगर हादरलं! "माझ्या मित्राच्या बहिणीला का छेडतोस?", संशयातून पॉलिटेक्निकच्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा निर्घृण खून, मुख्य संशयित फरार

IPL 2026, Video: एकट्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने झुंज दिली, पण संघाने साथ सोडली; अश्विनचा राजस्थान रॉयल्सवर हल्लाबोल

Palghar: स्विमिंग पूलमध्ये खेळाताना पाण्यात पडला, चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT