कल्याण, ता. १८ (बातमीदार) : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या करदात्यांनी चालू आर्थिक वर्षांत पालिकेच्या तिजोरीत आजपर्यंत ३९३ कोटींचा भरणा केला आहे. तर, या आर्थिक वर्षात ५०० कोटी रुपये वसुलीचे महापालिकेचे लक्ष्य आहे. मात्र, ही लक्ष्यपूर्ती गाठण्यासाठी महापालिकेकडे १३ दिवसच शिल्लक राहिल्याने ते पूर्ण होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका सध्या करदात्यांकडून कराचे पैसे जमा करण्यासाठी निकाराचे प्रयत्न करताना दिसत आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात ५०० कोटी रुपये करापोटी जमा करण्याचे महापालिकेने लक्ष्य ठेवले आहे. यासाठी करभरणा न करणाऱ्यांसाठी महापालिकेने अभय योजना लागू केली आहे. १ ते १५ मार्च या कालावधीत थकीत करवसुलीच्या दृष्टिकोनातून १०० टक्के व्याजमाफीची अभय योजना होती. ही योजना आता येत्या ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान, महापालिकेच्या कर विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत प्रशासनाच्या तिजोरीत ३९३ कोटींचा करभरणा झाला आहे. मालमत्ताधारकांनी अभय योजनेचा लाभ घेत करभरणा केला आहे. हे आर्थिक वर्ष संपेपर्यंत पालिकेला अजून १०७ कोटी रुपये वसूल करण्याचे लक्ष्य गाठावे लागणार आहे. यासाठी पालिकेकडे आता केवळ १३ दिवसच शिल्लक राहिले आहे.
२३१ कोटींची माफी
कर वेळेत भरल्याबद्दल आणि अभय योजनेमुळे मालमत्ताधारकांकडून व्याज, दंड घेण्यात आला नाही. यात महापालिकेने करदात्यांचे तब्बल २३१ कोटी माफ केले आहेत. येत्या ३१ मार्चपर्यंत अभय योजनेचा लाभ नागरिक घेणार असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
करबुडव्यांचे काय?
कल्याण-डोंबिवली महापालिकेची पाणीपट्टी अनेक वर्षांपासून न भरणाऱ्यांंची संख्या अधिक आहे. यात मोठ-मोठ्या सरकारी आस्थापनांचा आणि मालमत्तांचा समावेश असल्याचेही समजते. त्यामुळे या पाणीपट्टी, करबुडव्यांवर महापालिका काय कारवाई करणार? हादेखील सवाल उपस्थित होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.