मुंबई

तीन तरुणांवरील हल्ल्याप्रकरणी चार जण अटकेत

CD

उल्हासनगर, ता. १८ (वार्ताहर) : धूलिवंदनाच्या दिवशी थेट हातात बांबू घेत तीन तरुणांवर सुरक्षा रक्षकाने केलेल्या मारहाणीची धक्कादायक घटना समोर आली होती. कोणतेही कारण नसताना झालेल्या या हाणामारीत एक तरुण गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी तत्काळ हालचाली करत चार जणांना अटक केली आहे.
धूलिवंदनाच्या दिवशी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अभय गायकवाड, किशोर वाकळे आणि जय डांगे हे व्हिनस चौक येथून दुचाकीत पेट्रोल भरून घरी येत होते. कॅम्प ४ मधील राधाकृष्ण मंदिराजवळील कृष्ण पॅलेससमोर ते पोहोचले असताना अचानक सुरक्षा रक्षकाने त्यांना थांबवून वाद केला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या हल्ल्यात अभय गायकवाड गंभीर जखमी झाला होता. या घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी तातडीने कारवाई केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अरुण दुबळे यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास करून अजित पाल, ज्ञानबाबू पाल, कन्हैयालाल नाई आणि सुरेंद्र भार्गव या चार आरोपीना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! कोटपा कायदा अधिक कठोर करणार; तंबाखू विक्री आणि प्रचारावर कडक नियंत्रण येणार

Video: मला टी२० मध्ये २०० धावा करायच्यात...' वैभव सूर्यवंशीने पीटरसनसमोरच थेट सांगितलं; गेलच्या विक्रम मोडायचीही भाषा

Savarkar Defamation: सावरकर बदनामी प्रकरणात समाज माध्यम, सर्च इंजिन व वृत्तपत्राविरोधात अटक वॉरंटची मागणी; सात्यकी सावरकरांचा न्यायालयात अर्ज

हा पठ्ठ्या शॉपिंगच्या बॅगा उचलायचे घेतो ₹149! दिल्लीतील ‘कॅरीमेन’नं तर नवऱ्यांचंच काम केलं सोपं!” सोशल मीडियावर Viral

नवी मुंबईकरांनो तयारीत रहा! महापालिकेकडून १०% पाणी कपात लागू; आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

SCROLL FOR NEXT