भिवंडी, ता.१८ (बातमीदार): छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्याने देशवासी स्वातंत्र्याचा श्वास घेऊ शकतो. हिंदू धर्म टिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनी आयुष्य खर्ची केले आहे. शिवाजी महाराजांनी आयुष्यभर घोड्यावरून लढाया करीत स्वराज्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे भिवंडीत देखील हिंदुधर्माचे अस्तित्व असल्याचे जैनाचार्य महाबोधी सुरीश्वरजी महाराज यांनी सांगितले. भिवंडी शहर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे शहरात तिथीनुसार साजरा करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवानिमित्त ते बोलत होते.
शिवजयंती उत्सव समितीतर्फे सोमवारी तिथीनुसार शिवजंयती साजरी करण्यात आली. यानिमित्त शिवाजीनगर येथून शिवप्रतिमेच्या मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शिवप्रेमी लहानमुलांसह महिला व पुरुष सहभागी झाले होते.आदिवासींचा बोहाडा नाच, तरुणांचे तालीम पथक आणि सजविलेले चित्ररथ सामील झाले होते. हजारोच्या संख्येने सहभागी झालेल्या शिवप्रेमींमुळे मिरवणुकीत उत्साह संचारला होता. तीनबत्ती मार्केट, तानाजीनगर, नवीचाळ, प्रभुआळी मार्गे बाजारपेठ वाणीआळी पुढे टिळक चौक कासारआळी मार्गे शिवाजी चौकात मार्गस्थ झाली. यावेळी छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला आमदार महेश चौघुले, उत्सव समितीचे अध्यक्ष रुपेश म्हात्रे व शिवसेना नेते प्रकाश पाटील यांनी पुष्पहार घातला. त्यानंतर झालेल्या समारंभात जैनाचार्य महाबोधी सुरीश्वर महाराज यांनी शिवप्रेमींना संबोधित केले.याप्रसंगी शिवसेना नेते प्रकाश पाटील, आमदार महेश चौघुले,शिवजयंती समितीचे अध्यक्ष रुपेश म्हात्रे,शिवसेनेचे शहराध्यक्ष सुभाष माने, कार्याध्यक्ष कृष्णा गाजेंगी, सचिव मदन भोई, मिरवणूक समिती सभापती अरुण पाटील, माजी नगरसेवक प्रशांत लाड आदी मान्यवर उपस्थित होते.
-------------------------------------------------------
धर्मरक्षकांना शिवभक्तांचा मुजरा
भिवंडीच्या शिवजयंतीच्या मिरवणुकीत लोकांमध्ये मोठा उत्साह पाहावयास मिळतो. राजा छत्रपती शिवाजी महाराजांप्रती आदर आहे. गेली अनेक वर्षे खरा इतिहास आणि एक कर्तृत्ववान राजा शिवाजी महाराजांचे वारस असलेल्या संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या समोर आला नव्हता. स्वराज्यासाठी त्यांनी शंभरपेक्षा जास्त लढाया जिंकल्या आहेत. तसेच धर्मरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या संभाजी राजांना शिवभक्तांनी मुजरा केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.