मुंबई

बंद सिग्नल यंत्रणाअखेर कार्यान्वित

CD

सहा महिन्यांपासून महापालिकेचे दुर्लक्ष, स्थानिकांकडून नाराजी
ठाणे शहर, ता.१८ (बातमीदार)ः ठाण्यातील कासारवडवली वाहतूक उप विभागातील खेवरा सर्कल, वसंत विहार आणि डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह परिसरात ठाणे महापालिकेच्या खर्चातून उभारण्यात आलेली सिग्नल यंत्रणा सहा महिन्यापासून बंद होती. याबाबत लोकप्रतिनिधी तसेच स्थानिकांच्या तक्रारीनंतर ही सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.
ठाण्यात रस्त्यांवर विविध कामे सुरू आहेत. या कामांमुळे घोडबंदर मार्गावरील सिग्नल यंत्रणेत काहीसा अनियमितपणा आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहन चालकांचा बेशिस्तपणा वाढला आहे. रिक्षा चालक आणि दुचाकी चालकांकडून वाहतूक नियमांचे भंग करण्याचे प्रमाण वाढले आहे. चुकीच्या दिशेने वाहन चालवण्याचे प्रकार होत होते. अशातच कासारवडवली वाहतूक उपविभागाच्या हद्दीमधील खेवरा सर्कल, वसंत विहार आणि डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह या परिसरात असलेल्या सर्कलची सिग्नल यंत्रणा सुद्धा सुमारे सहा महिन्यापासून बंद ठेवण्यात आली होती. यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने माजी नगरसेवक तसेच स्थानिकांनी वाहतूक विभागाकडे तक्रारी केल्या होत्या.
------------------------------------
अपघातांचा धोका
सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे वाहन चालकांकडून मोठ्या प्रमाणात चुकीच्या मार्गाने वाहने चालवली जात होती. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघात असा दुहेरी धोका येथे निर्माण झाला होता. ठाणे महापालिकेकडून जवळपा ५१ लाखांचा खर्च येथे करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! कोटपा कायदा अधिक कठोर करणार; तंबाखू विक्री आणि प्रचारावर कडक नियंत्रण येणार

Video: मला टी२० मध्ये २०० धावा करायच्यात...' वैभव सूर्यवंशीने पीटरसनसमोरच थेट सांगितलं; गेलच्या विक्रम मोडायचीही भाषा

Savarkar Defamation: सावरकर बदनामी प्रकरणात समाज माध्यम, सर्च इंजिन व वृत्तपत्राविरोधात अटक वॉरंटची मागणी; सात्यकी सावरकरांचा न्यायालयात अर्ज

हा पठ्ठ्या शॉपिंगच्या बॅगा उचलायचे घेतो ₹149! दिल्लीतील ‘कॅरीमेन’नं तर नवऱ्यांचंच काम केलं सोपं!” सोशल मीडियावर Viral

नवी मुंबईकरांनो तयारीत रहा! महापालिकेकडून १०% पाणी कपात लागू; आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

SCROLL FOR NEXT