बदलापूर, ता. १८ (बातमीदार) : बदलापूर पश्चिमेकडील श्री टॉवर येथून दोन आठवड्यांत रविवारी या सुट्टीच्या दिवशी एकूण तीन सायकली चोरीला गेल्या आहेत. ही घटना येथील पार्किंग परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुख्य म्हणजे या सायकली एक १४ ते १५ वर्षांचा अल्पवयीन मुलगा चोरत असल्याचे दृश्य पाहून सोसायटीधारकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.
बदलापूर पश्चिम बेलवली परिसरातील श्री कॉम्प्लेक्स परिसरातील सात मजली श्री टॉवरमधील पार्किंग विभागात लॉक लावून ठेवलेल्या तीन सायकली चोरीला गेल्या आहेत. दोन आठवड्यांत रविवारच्या दिवशी पहाटे पाचच्या सुमारास ही चोरी झाली आहे. या तिन्ही सायकली एका अल्पवयीन मुलाने चोरल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे दृश्य पाहून सोसायटीधारकांना आश्चर्याचा धक्काच बसला. आपल्याच सोसायटीमधील मुलांच्या वयाच्या एका अनोळखी अल्पवयीन मुलाने या सायकली चक्क चावीशिवाय अनलॉक करून पळवल्या. हा मुलगा लवकर शोधून त्याचे अधांतरी असलेले भविष्य चांगले व्हावे आणि त्याच्या मनातील ही वृत्ती संपवावी, या हेतूने आम्ही चोरीच्या घटनेची बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात नोंद केल्याची माहिती येथील महिलांनी दिली. आमच्या सायकली शोधून देण्याची विनंती येथील मुलांनी पोलिसांना केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.