गृहकर्जासाठी म्हाडाकडून
तात्काळ मिळणार एनओसी
सोमवारपासून यंत्रणा सुरू होणार
बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : म्हाडाच्या लाॅटरीत लागलेले घर घेण्यासाठी अनेकांकडून वेगवगेळ्या बँकांकडून गृहकर्ज घेतले जाते. त्यासाठी आवश्यक असलेले ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) आता तात्काळ मिळणार आहे. संबंधिताने म्हाडाकडे ‘एनओसी’साठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर ती लगेच देता यावी म्हणून म्हाडाने त्यांच्या प्रणालीत बदल केला आहे. त्यामुळे सोमवारपासून संबंधितांना म्हाडाची एनओसी मिळणार आहे.
म्हाडाकडून सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने मुंबई, ठाण्यासह राज्यभरातील विविध मंडळांतर्गत घरांची लाॅटरी काढली जाते. घर लागल्यानंतर त्यासाठी बँकांकडून गृहकर्ज घेण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो. संबंधित अर्जदाराने एनओसीकरिता ऑनलाईन अर्ज केला असता, त्याला तत्काळ एनओसी मिळणे आवश्यक असतानाही त्यास कागदोपत्री विलंब लागतो. त्याची दखल घेत म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी गृहकर्जाच्या एनओसीसाठी आलेल्या अर्जावर तत्काळ निर्णय घ्यावा, असे निर्देश दिल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
-----
थेट बँकेला ई-मेल जाणार
म्हाडाकडून गृहकर्जासाठी दिली जाणारी एनओसी अर्जदाराने दिलेल्या बँकेच्या ई-मेलवर थेट पाठवली जाणार आहे. तसेच त्याची प्रत अर्जदाराला दिली जाणार आहे. त्यामुळे एनओसीमध्ये फेरफार होण्याचा धोका पूर्णपणे कमी होणार आहे. तसेच सदरची एनओसी बँकेला ईमेलवर मिळणार असल्याने त्याची पुढील कार्यवाही तत्काळ करणे शक्य होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.