मुरादाबादच्या गर्भवती महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया
गर्भवती असताना आली हिरड्यांना सूज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : गर्भवती असताना हिरड्यांना सूज आलेल्या उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील २५ वर्षीय गर्भवती फरहत अलीम खान हिच्यावर कामा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
ही महिला २१ आठवड्यांची गर्भवती आहे. गेल्या काही महिन्यांपासून तिच्या हिरड्यांमध्ये वेदनादायक लाल गाठ होती. ही गाठ हळूहळू मोठी होत गेली आणि एका अपघातात तिच्या तोंडावर जखम झाल्यानंतर रक्तस्राव सुरू झाला. उपचारासाठी त्यांनी अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला; पण त्यांना मोठ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला.
फरहत अखेरीस मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पोहोचली, जिथे तपासणीनंतर तिला हिरड्यांमध्ये कॅपिलरी हेमॅन्गिओमा (रक्तवाहिन्यांमधून तयार झालेली सौम्य गाठ) असल्याचे निदान झाले. त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय दंत महाविद्यालयात व नंतर मुंबईतील कामा रुग्णालयात पाठवण्यात आले. ७ मार्च २०२५ रोजी कामा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान अधिक रक्तस्राव झाला नाही. सध्या फरहतला रुग्णालयातील अतिदक्षता विभागात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.