वीर वाजेकरबरोबर अंजुमन महाविद्यालयाचा सामंजस्य करार
दोन्ही महाविद्यालयांत संशोधनासह कौशल्यविकास उपक्रम राबविणार
उरण, ता. २५ (वार्ताहर) ः उरण येथील वीर वाजेकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आणि अंजुमन इस्लाम महाविद्यालय, मुरूड यांच्यात बीएमएस (व्यवस्थापन अध्ययन), वाणिज्य आणि बीएससी आयटी (माहिती तंत्रज्ञान) विभागांसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक विकासाला चालना देणे, तसेच दोन्ही महाविद्यालयांमध्ये संशोधन व कौशल्यविकास उपक्रम राबवणे हा आहे.
या कराराच्या माध्यमातून विद्यार्थी आणि प्राध्यापक आदान-प्रदान कार्यक्रम, संयुक्त संशोधन प्रकल्प आणि कार्यशाळा, कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण, संघटित औद्योगिक भेटी आणि इंटर्नशिप संधी, संयुक्त सेमिनार आणि करिअर मार्गदर्शन सत्रे आदी कार्यक्रम संलग्न करण्यात आले आहेत. वीर वाजेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आमोद एन. ठक्कर यांनी या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करताना सांगितले, की हा करार विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक, संशोधन आणि व्यावसायिक संधी निर्माण करेल. बीएमएस, वाणिज्य आणि बीएससी आयटी विभागातील विद्यार्थी व्यावहारिक ज्ञान मिळवून उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात स्वतःला सिद्ध करू शकतील. तर मुरूडच्या अंजुमन इस्लाम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सजिद एफ. शेख यांनीही या कराराचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले, की उच्च शिक्षणात गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अशा करारांची अत्यंत गरज आहे. आम्ही या सहकार्याचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी वचनबद्ध आहोत. या सामंजस्य करारामुळे दोन्ही महाविद्यालयांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण होईल, उद्योग आणि शिक्षण यामधील दरी भरून काढली जाईल आणि विद्यार्थ्यांना उज्ज्वल करिअरसाठी नव्या संधी उपलब्ध होतील, असे या वेळी सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.