कर्जमुक्त करण्यासाठी बेस्टला १० हजार कोटी रुपये द्यावेत
बेस्टला वाचविण्यासाठी शिवसेना आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ ः बेस्टवर कर्जाचा डोंगर झाला असून, कर्जमुक्त करण्यासाठी बेस्ट उपक्रमाला १० हजार कोटी रुपये देण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली आहे. बेस्टला वाचविण्यासाठी आता शिवसेना आक्रमक झाली आहे.
गेल्या काही वर्षांत बेस्टची तूट वाढत आहे. बेस्टला वेळीत मदत न केल्यास बेस्ट उपक्रमाला वाचवणे अवघड होणार आहे. बेस्ट हे पालिकेचे अंग असून, बेस्टची जबाबदारी पालिकेची आहे. पालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प समाविष्ट करा, अशी मागणी सातत्याने होत आहे. मात्र पालिका आयुक्तांनी या मागणीकडे कानाडोळा केला आहे. पालिका बेस्टला अनुदान देते मात्र ते तुटपंजे आहे. बेस्टला कर्जमुक्त करण्यासाठी १० हजार कोटींचा निधी मुंबई महापालिकेने बेस्टला तात्काळ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी केली आहे.
...तर बेस्ट कामगारांचा गिरणी कामगार होईल
मुंबई शहरातील आशिया खंडात नावाजलेला बेस्ट उपक्रम सध्या बंद होण्याच्या मार्गावर आहे. बेस्ट उपक्रमाच्या प्रश्नांसंदर्भात या विधिमंडळाच्या अधिवेशनात चर्चा करून निर्णय न घेतल्यास उपक्रम बंद होऊन, बेस्ट कामगारांचा गिरणी कामगार होईल, अशी भीती बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी व्यक्त केली.
काय आहेत मागण्या?
- मुंबईकर प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी खासगी कंत्राटी बससेवा बेस्टमधून हद्दपार करण्यात यावी.
- स्वमालकीच्या बसगाड्या खरेदी कराव्यात.
- सेवानिवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी, अंतिम देयके तत्काळ द्यावीत.
- वेतन कराराची थकबाकी द्यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.