मुंबई

सहकार महर्षी घोन्सालविस पुरस्काराचे एप्रिलमध्ये वितरण

CD

सहकार महर्षी घोन्सालविस पुरस्काराचे एप्रिलमध्ये वितरण
विरार, ता. २५ (बातमीदार) : वसई तालुक्यातील २०२३-२०२४ व्या आर्थिक वर्षात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी बँक, पतसंस्था, विविध कार्यकारी संस्था, मच्छीमार संस्था व कन्झ्युमर्स संस्थांचा गौरव केला जाणार आहे. या संस्थांना सर्वोत्कृष्ट सहकारी संस्था सहकार महर्षी डॉमणिक घोन्सालविस यांच्या नावाने पुरस्कार देऊन ७ एप्रिल रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिशप थॉमस डिसोजा (बसई धर्मप्रांत) असणार आहेत, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार स्नेहा दुबे-पंडित, नालासोपाराचे आमदार राजन नाईक व माजी आमदार हितेंद्र ठाकूर असणार आहेत. हा कार्यक्रम ७ एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजता वसईमधील क्रीडा मंडळ येथे होणार असल्याची अशी माहिती कार्याध्यक्ष रोहन घोन्सालविस, विश्वस्त गवेल मध्याडो, अशोक कुलास, अशोका डिसिल्वा व ब्रॉन्सन घोन्सालविस यांनी दिली आहे. या कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार वसई जनता सहकारी बँक, सर्वोत्कृष्ट पतसंस्था पुरस्कार जीवन विकास को- ऑप. क्रे. सो.लि., सर्वोत्कृष्ट विविध कार्यकारी संस्था पुरस्कार वसई शेतकरी विविध कार्यकारी, सर्वोत्कृष्ट मच्छीमार संस्था पुरस्कार वसई मच्छीमार सर्वोदय, मर्यादित, सर्वोत्कृष्ट ग्राहक संस्था पुरस्कार ग्रामोन्नती सहकारी कन्ट्युमर्स यांना गौरविण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, SA vs NZ Semi: दक्षिण आफ्रिकेसोबत चिटिंग झाली? एडन मार्करमची विकेट ढापली? 'त्या' कॅचवरून वाद पेटला Video

Latest Marathi News Live Update : नोकरीच्या आमिषाने १६ जणांची फसवणूक

Ladki Bahin Yojana : केवायसी करूनही मिळेना लाडक्या बहिणींना दरमहा अनुदान

Iran-Israel War: इराणच्या युद्धात मुंबईच्या तरुणाचा मृत्यू; ड्रोन हल्ल्यात भारतातील तिघे ठार

Mumbai News: व्हॉट्सॲप चॅट घटस्फोटाचे कारण असू शकत नाही - उच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT