खारघर, ता. २५ (बातमीदार) : पनवेल महापालिकेने खारघरमधील सेक्टर ३४ आणि ३५ मध्ये रस्ते डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात केल्यामुळे रहिवाशांकडून समाधान व्यक्त होत आहे.
खारघर सेक्टर ३४ आणि ३५ हा उंच इमारतीचा परिसर म्हणून परिचित आहे. या भागात सिडको आणि पालिकेकडून नागरी सुविधांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजी पसरली होती. उंच इमारत परिसरात घरगुती गॅसवाहिनी जोडणीच्या कामासाठी परिसरातील रस्त्यावर खोदकाम केल्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यात पावसाळ्यात खोदकाम केलेल्या जागेवरील माती वाहून गेल्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. त्यामुळे किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या होत्या. पादचारी आणि वाहनांसाठी रस्ता धोकादायक बनला असून पालिकेकडून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी तक्रार रहिवाशांनी नावडे उपविभाग कार्यालयाकडे केली होती. दरम्यान, प्रभाग अधीक्षक अमर पाटील यांनी पालिकेच्या बांधकाम विभागाच्या विभागप्रमुखाला पत्र पाठवून खारघर सेक्टर ३४ आणि ३५मधील रस्त्याची माहिती निदर्शनास आणून दिली होती. अखेर पालिकेकडून येथील रस्ते डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाल्यामुळे रहिवासी समाधान व्यक्त करीत आहेत.
------------
खारघर सेक्टर ३५ परिसरात तीन वर्षांपूर्वी घरगुती गॅसवाहिनीच्या कामासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले होते. काम पूर्ण झाल्यावर रस्त्यांची डागडुजी करणे आवश्यक होते; मात्र त्याकडे सिडको आणि पालिकेकडून दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली होती. पालिकेने काम सुरू केल्यामुळे समाधान वाटत आहे.
- डॉ. स्वप्नील पवार, रहिवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.