मुंबई

मुरबाड-कल्याण रेल्वे सुरू करा

CD

मुरबाड, ता.२५ (बातमीदार)ः मुरबाड-कल्याण रेल्वे मार्गाला चालना मिळावी, अशी मागणी मुरबाड तालुक्यातून होत आहे. सध्या रेल्वे प्रकल्पाचे काम थंडावले आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने त्वरित कारवाईची मागणी मुरबाड नागरिक मंचाचे संयोजक कृष्णकांत मलिक यांनी केली आहे.
मुरबाड-कल्याण रेल्वे प्रकल्प पूर्ण झाल्यास मुरबाड आणि परिसरातील नागरिकांना मुंबईला सहजपणे प्रवास करता येईल. यामुळे मुरबाडमधील पर्यटन, उद्योग व्यवसायाला चालना मिळून रोजगार निर्मिती होईल. स्थानिक उत्पादनांची बाजारपेठ वाढून शेतकरी आणि व्यापारी वर्गाला मोठा फायदा होणार आहे, त्यामुळे रेल्वेसाठी जमीन संपादनाला प्राधान्य देण्याची, पुरेसे निधी उपलब्ध करून देण्याची आणि प्रकल्पाच्या प्रगतीबाबत जनतेशी पारदर्शक संवाद साधण्याची मागणी कृष्णकांत मलिक यांनी केली आहे. मुंबईच्या व्यस्त जीवनातून दूर असलेला मुरबाड हे शांत आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी लोकप्रिय ठिकाण आहे. येथे अनेक पर्यटन स्थळे आहेत. तसेच चाकरमान्यांना नोकरी धंद्यासाठी मुंबई व उपनगर परिसरात जावे लागते. मात्र, रेल्वे सुविधा नसल्यामुळे हा प्रवास त्रासदायक ठरत आहे.
-------------------------------------------------------------
भारतातील पहिल्या रेल्वे मार्गाच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे समाजसुधारक नाना शंकर शेठ यांचे जन्मस्थान असलेल्या मुरबाड येथे रेल्वेची सुविधा नसणे, ही मोठी दुर्दैवी बाब आहे. या भागाच्या विकासासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
- किशोर पिसाट, मुरबाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीत सुरुवात! सेन्सेक्स 800 अंकांनी वाढला; आज 2 मोठे IPO बाजारात

Latest Marathi News Live Update : आखाती देशांतील संघर्षाचा परिणाम; तेल कंपन्यांकडून ब्रॅण्डेड पेट्रोलचे दर वाढवले

Jalna News: जालना जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट; शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान

Jalna News: जालना शेतकऱ्यांवर गारपीटचा मोठा फटका; रब्बी पिकांवर संकट

Koyna Dam Water Release : कृष्णाकाठची तहान भागणार! कोयना धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू; 'या' तारखेला सांगलीत पोहोचणार पाणी

SCROLL FOR NEXT