मुंबई

उपराष्ट्रपती जगदीप धनखड शनिवारी वाशीत

CD

खारघर, ता. २५ (बातमीदार) : महर्षी दयानंद सरस्वती यांचा २००वा जन्मदिन व आर्य समाजाच्या १५०व्या स्थापना दिन कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (ता. २९) वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये करण्यात आले आहे. आर्य समाजाच्या वतीने २९ आणि ३० मार्चला होणाऱ्या कार्यक्रमासाठी मुख्य पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती जगदीप धनखड, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहे.
जगात मानवसेवा आणि समाज सुधारणेसाठी स्थापन झालेला आर्य समाज ४० देशांत कार्यरत असून, आर्य समाजाच्या वतीने आर्य मंदिर, शाळा, गुरुकुल, अनाथ आश्रम, रुग्णालय मदत केंद्र, व्यायामशाळा, नशामुक्ती केंद्र सुरू आहे. आर्य समाजाचा १५०वा स्थापना दिवसानिमित्त वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात शनिवार आणि रविवारी (२९ आणि ३० मार्च) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत शोभायात्रा, यज्ञ, ध्वजारोहण, दीपप्रज्वलन; तर सायंकाळी साडेआठ या वेळेत आर्य समाजाचा गौरवशाली इतिहास, वर्तमान आणि भविष्यातील आर्य समाज, सनातन संस्कृतीचा रक्षक आर्य समाज या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ८.३० या वेळेत युवाशक्तीचे मार्गदर्शक महर्षी दयानंद, नारीशक्तीचा प्रेरणास्रोत, राष्ट्र का रक्षक आर्य समाज आणि आर्य राष्ट्राचे आर्यवीर, वीरांगना आदी विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Strait : मोठी बातमी! भारतीय तेल जहाजे अडकलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकेचा हल्ला; अनेक इराणी जहाजे नष्ट!

Nagpur Crime : चारित्र्याच्या संशयातून प्रेयसीला गर्भाशयाची पिशवी फाटेपर्यंत लाथाबुक्क्यांनी मारहाण; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, प्रियकराला अटक

Latest Marathi News Live Update : रत्नागिरीत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध

‘तुमच्या पोरीचं ५० वर्षांच्या म्हाताऱ्यासोबत लफडं!’ विशालसोबतच्या चर्चेमुळे रुचिताच्या घरच्यांना त्रास; म्हणाली, ‘पप्पा खूप रडले आणि...’

Kolhapur Water Tax Hike : कोल्हापूर महापालिकेचा पहिला दणका! रहिवासी पाणीपट्टीसाठी १० टक्के दरवाढ निश्चित होणार

SCROLL FOR NEXT