मुंबई

अंबरनाथमध्ये १४ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

CD

अंबरनाथ, ता. २५ (वार्ताहर) : नववीत शिकणाऱ्या एका १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
अंबरनाथ पश्चिम येथे भास्करनगर परिसरात रविवारी (ता. २३) संध्याकाळी ही घटना घडली. पॅटरीना राहुल बिस्ते या १४ वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरात कोणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पॅटरीनाचे वडील राहुल यांची पत्नी सोडून गेली आहे. पॅटरीना ही तिची लहान बहीण, वडील, आजी अंजु यांच्यासोबत राहत होती. मात्र, ती रविवारी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसल्याने बिस्ते कुटुंबीयांनी तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती अंबरनाथ पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पॅटरीना हिला पुन्हा बी. जी. छाया या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी रात्री साडेदहा वाजता तिला मृत घोषित करून शव विच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, याप्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT