तुर्भे, ता. २५ (बातमीदार) : वेळेत वेतन अदा न करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी उपायुक्तांना दिले आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या कंत्राटदाराकडून कामगारांना वेळेत वेतन न मिळाल्याने या कामगारांनी मंगळवारी (ता. २५) पालिका मुख्यालयात धरणे आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत हे आदेश देण्यात आले आहेत.
नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ग्रंथालयाला मनुष्यबळ पुरवणाऱ्या चामुंडाई एंटरप्रायझेस कंपनीच्या कंत्राटदाराने संबंधित कर्मचाऱ्यांना महिना उलटूनही १८ दिवस झाले तरी वेतन दिले नाही. शिवाय, या कंत्राटदाराकडून मागील काही महिन्यांपासून ८० कामगारांचे भविष्यनिर्वाह निधीचे पैसेदेखील खात्यामध्ये भरले नाहीत. जानेवारी २०२३ पासून कंत्राटदाराला कार्यादेश मिळालेले आहेत. तेव्हापासून एकदाही या कंत्राटदाराने संबंधित कामगारांचे वेळेत वेतन केलेले नाही, असा आरोपही कामगारांनी केला आहे. इतकेच नव्हे तर तीन ते चार महिन्यांनी पीएफ भरला जातो, असे कामगारांनी सांगितले. त्याचप्रमाणे उद्यानाची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या हर्षल एंटरप्रायझेस या कंत्राटदाराकडूनही अद्याप कामगारांचे वेतन करण्यात आले नाही. फेब्रुवारी महिन्यात केवळ अर्धाच पगार या कामगारांना दिला आहे. त्यामुळे समाज समता संघटनेच्या नेतृत्वाखाली उद्यान आणि ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्यांनी पालिका उपायुक्त किसनराव पलांडे यांच्याकडे समस्या मांडली. पलांडे यांनी तत्काळ कंत्राटदारांना बोलावून वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच लवकरात लवकर वेतन करण्याचे आदेश दिले. उपायुक्तांच्या आश्वासनाने समाधान न झाल्याने अखेर कामगारांनी आयुक्तांकडे धाव घेऊन वेतनाविषयी समस्या मांडली. त्यावर आयुक्तांनी कामगारांचे सर्व प्रश्न सोडवण्याचे आदेश उपायुक्त किसनराव पलांडे यांना दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.