अजय साळवी यांना मास्टर्स बॅडमिंटन नॅशनल चॅम्पियनशिप पदक
वसई, ता. २५ (बातमीदार) ः नुकत्याच गोवा येथे झालेल्या मास्टर्स बॅडमिंटन नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत पालघर जिल्ह्याच्या अजय साळवी यांनी ५० वर्षांवरील वयोगटात मिश्र दुहेरीत कांस्य पदकाची कमाई केली. या पदकांसोबतच त्यांनी आपले नाव वर्ल्ड मास्टर्स चॅम्पियनशिपसाठी पक्के केले आहे. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या वर्ल्ड मास्टर्स चॅम्पियनशिपसाठी ५० वर्षांवरील मिश्र दुहेरीत अजय हे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ही स्पर्धा सप्टेंबर महिन्यात थायलंड येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी पालघर बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष पंकज ठाकूर व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.