मुंबई

भात खरेदी केंद्राच्या गोदामाला भीषण आग

CD

भातखरेदी केंद्राच्या गोदामाला आग
कासा, ता. २५ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील घोळ येथील आदिवासी विकास महामंडळाच्या भातखरेदी केंद्राच्या गोदामाला मंगळवारी (ता. २५) मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत गोदामातील सुमारे तीन हजार ७० क्विंटल भात आणि ३० हजार रिकाम्या बारदानाच्या गोणींना आग लागली. ही आग मध्यरात्री एकच्या सुमारास लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

गोदामातून धूर निघत असल्याचे शेजारील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित अधिकाऱ्यांना माहिती दिली. अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र आगीच्या तीव्रतेमुळे प्रयत्न अपुरे पडले. तास-दीड तासानंतर डहाणू नगर परिषद व अदाणी उद्योग समूहाच्या अग्निशमन दलांनी घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ग्रामस्थांनी सांगितले, की भातखरेदी केंद्राचे गोदाम अतिशय जीर्ण अवस्थेत आहे. तेथे जाण्यासाठीचा रस्ताही खराब आहे. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी पोहोचत आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, तरी मोठ्या प्रमाणात अन्नधान्याची हानी झाली.

गोदामाला मध्यरात्री आग लागली. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही; मात्र ही आग अज्ञात व्यक्तीने लावली असावी असा संशय आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करीत आहोत.
- योगेश पाटील, व्यवस्थापक, प्रादेशिक कार्यालय, जव्हार

शासनाने या भागात सुरक्षितता उपाययोजना कराव्यात. स्थानिक स्तरावर अग्निशमन व्यवस्था उभारावी, अशी मागणी केली आहे. भातखरेदी गोदामाची सुसज्ज इमारत असावी.
- अरुण कदम, पंचायत समिती सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay: थलापती विजयच्या दारात सत्तेची ‘ऑफर’! भाजप म्हणते उपमुख्यमंत्री व्हा, पण विजयची नजर थेट मुख्यमंत्रिपदावर?

फक्त 50 हजार रुपयांत स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; खरेदीसाठी लागल्या रांगा, पाहा सर्व डिटेल्स एका क्लिकवर

Summer Health Tips: उन्हाळा आला…आरोग्याची काळजी घ्या! तब्येत सांभाळण्यासाठी काय खावं, काय टाळावं ते जाणून घ्या

Latest Marathi Live Update : नाशिकमध्ये परप्रांतीय ठेकेदाराकडून सुपरवायझरला बेदम मारहाण

LPG Gas Shortage: वडापाव चाळिशीपार, चहा तिशीला! चाकण औद्योगिक वसाहतीतील स्थिती; भजी खाणेही आवाक्याबाहेर

SCROLL FOR NEXT