मुलुंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा
मुलुंड, ता. २५ (बातमीदार) ः मुलुंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने (अजितदादा पवार) मुलुंड तालुकास्तरावर पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी आणि आगामी महापालिका निवडणुकीची तयारी करण्यासाठी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन गोप्रम हॉलमध्ये रविवारी (ता. २३) केले होते. या कार्यक्रमात मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष, शिवाजीराव नलावडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्यात जिल्हाध्यक्ष सुरेश भालेराव, बापू धुमाळ, स्नेहा कुऱ्हाडे यांसह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मुलुंड तालुकाध्यक्ष कन्हैय्यालाल गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.