निलंबित केलेल्या विद्यार्थ्याच्या समर्थनार्थ आंदोलन
धारावी, ता. २५ : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबईने रामदास पी. एस. या दलित पीएचडी संशोधक विद्यार्थ्याला निलंबित केलेले आहे. केंद्र सरकारवर टीका केल्याबद्दल आणि नवीन शिक्षण धोरणविरोधी आंदोलनात घेतलेल्या सहभागाबद्दल रामदासला निलंबित केले असल्याचा आरोप करीत या बेकायदा निलंबन कारवाईचा निषेध करण्यासाठी, रामदासच्या समर्थनार्थ बुधवारी (ता. २६) सायंकाळी साडेचार वाजता मुंबईत टीआयएसएसच्या समोर आंदोलन करण्यात येणार आहे. यात विद्यार्थी, महिला, शिक्षक, लेखक, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजन समितीतर्फे शैलेंद्र कांबळे, सुबोध मोरे, रोहिदास जाधव, प्रीती शेखर, महेंद्र उघडे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.