मुंबई

फेरीवाला धोरण पालिकेला मुहूर्त गवसला

CD

फेरीवाला धोरणाला मुहूर्त
महापालिका सदस्य निवड करणार, अकरा एप्रिलला निवडणूक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : महापलिका क्षेत्रात फेरीवाल्यांची दिवसागणिक वाढती संख्या, अनधिकृतपणे ठाण मांडून बसणारे फेरीवाल्यांवर अंकुश यावा, यासाठी ठाणे पालिकेच्या माध्यमातून फेरीवाला धोरण राबविण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, यासाठीचे धोरण राबविण्यासाठी सहा ते सात वर्षानंतर पालिकेला मुहूर्त गवसला असून अकरा एप्रिलला समिती निवडीसाठीची निवडणूक होणार आहे.
ठाणे महापलिका क्षेत्रातील घोडबंदर परिसरात अनधिकृतपणे ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण पथकासह सहाय्यक आयुक्त यांच्यावर फेरीवाल्यांकडून हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर ठाणे पालिका क्षेत्रातील अनधिकृत फेरीवाल्यांचा व फेरीवाला धोरण राबविण्याचा विषय चर्चेला आला. त्यानंतर २०१९ मध्ये ठाणे पालिकेने फेरीवाल्यांचा सर्व्हे केला होता. त्यावेळी करण्यात आलेल्या सर्व्हे नुसार शहरात केवळ ६ हजार फेरीवाल्यांचा सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये केवळ २ हजार फेरीवाल्यांनी आपले पुरावे प्रशासनाकडे जमा केले असल्याचा दावा त्यावेळी प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आला होता. दरम्यान, फेरीवाला धोरण अंतिम करतांना फेरीवाल्यांची संख्या १,३६५ एवढी निश्चित झाली आहे. सध्या ३० जणांची कमिटी फेरीवाल्यांची आहे. मात्र, आता नव्याने कमिटी तयार होणार असून त्यात २० जणांचा समावेश असणार आहे. यासाठीच्या निवडणुका अकरा एप्रिल रोजी होणार आहेत.
------------------------------------------------------
िनिवडणुकीचा कार्यक्रम
- मतदान केंद्र निहाय मतदार यादी २६ मार्च रोजी प्रसिध्द केली जाणार आहे. २७ आणि २८ मार्च रोजी सकाळी १० ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत ठाणे महापालिका मुख्यालय, तळ मजला येथे नामनिर्देशन पत्राचे वाटप होणार आहे. त्यानंतर १ आणि २ एप्रिलला नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहे.
- अर्जांची छाननी ३ एप्रिल रोजी केली जाणार असून ४ तारखेला आक्षेप अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ७ एप्रिल रोजी या अर्जावर सुनावणी घेतली जाणार आहे. तर ८ तारखेला दुपारी ३ पर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा कालावधी असणार आहे.
- प्रभाग समिती कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ५ वाजेपर्यंत मतदान करावे लागणार आहे. मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यानंतर ५ वाजतानंतर महापालिका मुख्यालयात मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
़़़ः-----------------------------------------------------
निवडणूक आचारसंहितेची अडचण
फेरीवाला कमिटीची निवडणुक प्रक्रिया डिसेंबर २०२३ मध्ये पार पडणार होती. मात्र, त्यावर काहीच तोडगा निघू शकलेला नाही. अद्यापही फेरीवाला धोरणा संदर्भातील निवडणुक प्रक्रिया पार पाडण्यासाठी पालिकेला वेळ मिळू शकलेला नाही. त्यातच २०२४ मध्ये पूर्वी लोकसभा निवडणुकीचा त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची अडचण आल्याचे दिसून आले आहे. आता पालिकेने या संदर्भात हालचाली सुरु करणे अपेक्षित असताना, हे धोरण अंतिम टप्यात असल्याचा दावा पालिका प्रशासनकडून त्यावेळी करण्यात आला होता.
.................................
फेरीवाला धोरणसंदर्भात आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुका झाल्यानंतर फेरीवाला कमिटी अस्तित्वात आल्यानंतर फेरीवाल्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या तसेच फेरीवाल्यांच्या हिताचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
- शंकर पाटोळे, उपायुक्त, अतिक्रमण, महापालिका, ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर 'नंदा देवी' मोठ्या दिमाखात भारतात दाखल! तुमच्या घरातला गॅसचा प्रश्न सुटला...

पत्नी देवीशाचा एक प्रश्न अन् सूर्यकुमार यादवच्या कारकीर्दिला मिळाली कलाटणी; T20 World Cup विजेत्या कर्णधाराने अखेर सिक्रेट सांगितले

Gas Cylinder Shortage : अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे अन्नछत्र बंद; भाविकांच्या अन्नाचा प्रश्न ऐरणीवर, प्रसादाचा लाडू सुद्धा बंद

Gold Investment: युद्ध सुरू असतानाही सोन्याचे भाव का पडले? शेअर बाजार कोसळला तरी सोनं स्वस्त का? पुढे काय होणार? तज्ज्ञांचे मत

Latest Marathi News Live Update : मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT