जिल्ह्यातील शेतकरी आता बनणार डिजिटल
गावागावात ॲग्रीस्टॅक योजना राबवण्यावर भर; फार्मर आयडी बनवण्याची अंतिम मुदत ३१ मार्च
वाणगाव, ता. २५ (बातमीदार) : शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलदगतीने पोहोचवण्यासाठी जिल्ह्यातील सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. त्यासाठी ॲग्रीस्टॅक (डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रिकल्चर) योजना शासन राज्यात राबवत आहे. त्यासाठी जवळच्या महा ई-सेवा केंद्रामध्ये जाऊन आपला ७/१२ला आधार लिंक करून फार्मर आयडी बनवून घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालय आणि कृषी विभाग यांनी गावोगावी फार्मर आयडी कॅम्प राबवत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून शेतकऱ्यांना नोंदणीचे आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांना या योजनेतून आधार कार्डसारखे स्वतःचे ओळखपत्र देण्यात येणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हे काम सुरू होऊन मार्चमध्ये संपणार आहे. शेतकऱ्यांना फार्मर आयडी शासकीय कामासाठी उपयुक्त ठरणार असून त्यांचा वेळ आणि पैसाही वाचणार आहे. फार्मर आयडी बनवून घेण्यासाठी ३१ मार्च ही अंतिम मुदत असल्याने मुदतीपूर्वी जिल्ह्यातील शेतकरीबांधवांनी फार्मर आयडी बनवून घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर यांनी केले आहे.
-----------------------------------
डहाणूत ॲग्रीस्टॅक मोहिमेला सुरुवात
डहाणूत कृषी विभाग, तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती यांच्यामार्फत तालुक्यातील विविध ठिकाणी फार्मर आयडी बनवून घेण्याचे कॅम्प घेण्यात आले आहेत.
-----------------------------
...अन्यथा योजनांचा लाभ नाही
सरकारी योजनांसाठी आता शेतकऱ्यांना फार्मर युनिक आयडी ‘ॲग्रीस्टॅक’ बनवणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या नवीन नियमाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याने ॲग्रीस्टॅक प्रोग्रामअंतर्गत आपले शेतजमीन आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे; अन्यथा शेतकऱ्यांना पीएम किसान, नमो शेतकरी योजना, पीक विमा योजना आणि अन्य कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही.
---------------------------
तहसीलदार डहाणू, गटविकास अधिकारी डहाणू आणि डहाणू तालुका कृष अधिकारी यांच्याकडून सर्व शेतकरीबांधवांना आवाहन करण्यात आले आहे की, आपले फार्मर आयडी तयार करून घेण्यासाठी जवळच्या गावातील सीएससी सेंटर किवा कॅम्पमध्ये जाऊन आपला ७/१२ व आधार लिंक मोबाईल नंबर घेऊन आपला फार्मर आयडी तयार करून घ्यावा. यासाठी गावातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करावा.
---------------------------
सपोर्ट सिस्टीमचा अवलंब
पीक संरक्षण, जमिनीचे आरोग्य, हवामान अंदाज, भूजल पातळी यांसारखी महत्त्वाची माहिती एकत्रित करून त्यावर आधारित सपोर्ट सिस्टीम उभारण्यात येणार आहे. म्हणजेच पाऊस किती पडणार, यासारखीही माहिती आता शेतकऱ्यांना मिळेल.
---------------------------
फार्मर आयडी नोंदणी करण्याची अंतिम मुद्दत ३१ मार्च आहे. तत्पूर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्वरित आपल्या नजीकच्या महा ई-सेवा केंद्रात जाऊन फार्मर आयडी तयार करून घ्यावा, जेणेकरून शासनाच्या सर्व योजनांचा लाभ त्यांना मिळू शकेल.
- नीलेश भागेश्वर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पालघर
--------------------------------
ओळखपत्रात काय असेल?
या ओळखपत्रात शेतकऱ्याच्या जमिनीची माहिती, पीक पेरणी नोंद, जनावरांची माहिती, योजनांच्या लाभाची नोंद आदी असणार आहे.
------------------------
शेतकऱ्यास उपयोग
ओळखपत्रातील माहितीचा फायदा शेतकऱ्यांस पीककर्ज, पीकविमा, विविध शासकीय योजनांकरिता अर्ज करताना होणार आहे. हंगामातील पीकस्थिती, पीक कर्जस्थिती, पीक सर्व्हे, पीक नुकसान, हवामान आधारित पीक सल्ले, योजनांची थेट माहिती मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.