पालिकेच्या बंद पडलेल्या वार्षिक सहली सुरू करा
पालकवर्गाची सोशल मीडियावर पाेस्ट व्हायरल
वाशी, ता. २५ बातमीदार ः नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने काही दिवसांपूर्वी कोरोनानंतर चार वर्षांनी प्रथमच मुलांचा आनंद द्विगणित करण्यासाठी इमॅजिका पार्क येथे वार्षिक सहलीचे आयोजन केले होते. मात्र एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने या वार्षिक सहलीला गालबोट लागले होते. त्यामुळे पालिकेने यापुढे सहली बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र या बंद करण्यात आलेल्या सहली पुन्हा सुरू करण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी पालकांची पोस्ट सोशल मीडियावर वायरल होत आहे. काही पालकांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना पत्र लिहून वार्षिक सहल पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
पालिकेने चार वर्षांनंतर यंदा प्रथमच इमॅजिका पार्क येथे वार्षिक सहलीचे आयोजन केले होते. या सहलीमध्ये आयुष सिंग नावाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. यामुळे पालिकेच्या नियोजनावर सर्व स्तरातून टीका होऊ लागली. मनसेकडून तर याप्रकरणी पालिका अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यामुळे पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पालिकेच्या सर्व सहली रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे मात्र इतर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ लागल्याचे पालकवर्गाकडून सांगण्यात येत आहे. अनेक शैक्षणिक सहली या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असतात. या सहलीमुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळते. यामुळे कायमस्वरूपी सहलीच बंद करण्याच्या निर्णयावर समस्त पालकवर्गाकडून टीका होऊ लागली आहे. शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांना पुस्तकाबाहरेच जग दाखवते. त्यातच मध्यमवर्गीय पालक विद्यार्थ्यांना विविध ठिकाणी नेऊ शकत नाहीत. त्यामुळे या सहली पुन्हा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी पालकवर्गाकडून करण्यात येत आहे.
.................
नवी मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये गरीब मुले शिकत असतात. जे पालिकेच्या शाळेतील सहलीला विरोध करतात त्यांची मुले पालिकेच्या शाळेत शिकत नाहीत. त्यामुळे त्यांनी विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. जर पालक स्वत:च्या मर्जीने मुलांना सहलीला पाठवत असतील तर प्रशासनाने त्या विद्यार्थ्यांना घेऊन जावे. पालिकेने या सहली पुन्हा सुरू न केल्यास त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात येईल, असे माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी सांगितले.
...............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.