मुंबई

लोकअदालतीतून प्रलंबित‍ प्रकरणांचा निपटारा

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २५ : तालुकास्तरावर आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीतून कल्याण व भांडुप परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित; तसेच वीजचोरीची दाखलपूर्व व प्रलंबित अशी पाच हजार ९२७ प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आली. महावितरणच्या उपलब्ध सवलतीचा लाभ घेत ग्राहकांनी सात कोटी ८६ लाख रुपयांचा भरणा केला.
कल्याण व भांडुप परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या; तसेच वीजचोरीची दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने सोडवण्यासाठी लोकअदालतीत ठेवण्यात आली होती. कल्याण परिमंडलांतर्गत पाच हजार ६१८ प्रकरणांमध्ये तडजोड होऊ शकली. यात सात कोटी ५२ लाख रुपयांचा भरणा झाला. तर भांडुप परिमंडलांतर्गत ३३ लाख ३२ हजार रुपयांचा भरणा करणाऱ्या ३०९ ग्राहकांच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सहकार्याने; तसेच भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे व कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता चंद्रमणि मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंते, महावितरणच्या विधी विभागाने लोकअदालत यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, SA vs NZ Semi: दक्षिण आफ्रिकेसोबत चिटिंग झाली? एडन मार्करमची विकेट ढापली? 'त्या' कॅचवरून वाद पेटला Video

Latest Marathi News Live Update : नोकरीच्या आमिषाने १६ जणांची फसवणूक

Ladki Bahin Yojana : केवायसी करूनही मिळेना लाडक्या बहिणींना दरमहा अनुदान

Iran-Israel War: इराणच्या युद्धात मुंबईच्या तरुणाचा मृत्यू; ड्रोन हल्ल्यात भारतातील तिघे ठार

Mumbai News: व्हॉट्सॲप चॅट घटस्फोटाचे कारण असू शकत नाही - उच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT