मुंबई

अपघातात रिक्षाचालक जखमी

CD

अपघातात रिक्षाचालक जखमी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनरने रिक्षाला धडक दिली. या घटनेत रिक्षाचालक धीरजकुमार मेहता (४२) हा जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (ता. २५) दुपारी पातलीपाडा उड्डाणपुलावर घडली. यामुळे ठाण्याकडून घोडबंदरकडे जाणारी वाहतूक सुमारे ४० मिनिटे धीम्या गतीने सुरू होती. अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यावर वाहतूक पूर्वपदावर आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली. न्हावाशेवा येथे कंटेनर घेऊन चालक शोहेब अत्तर हा घोडबंदर रोडमार्गे सुरत येथे निघाला होता. याचदरम्यान पातलीपाडा उड्डाणपुलावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व पुढे असलेल्या रिक्षावर जाऊन धडकला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि कासारवडवली पोलिसांनी धाव घेतली. त्यावेळी रिक्षाचालक जखमी झाल्याचे समोर आले. या अपघाताने वाहतुकीवर परिणाम झाल्याने तातडीने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर-रत्नागिरी महामार्ग ८ पदरी असणार का? शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाची महत्त्वाची माहिती देत एकनाथ शिंदेंनी उत्तरच सांगितलं!

LPG Supply in India : युद्धामुळे LPG चा पुरवठ्याचं संकट; इंटरनेटवरही होणार परिणाम?

IPL 2026 Schedule Announced : आयपीएलच्या १९व्या पर्वाचे वेळापत्रक जाहीर; RCB vs SRH यांच्यात सलामी; पहिल्या २० सामन्यांचं टाईमटेबल

Pune crime cctv: पुणं हादरलं! मित्राची थट्टा केली म्हणून आला राग, सपासप वार करत केला खून! सीसीटीव्ही व्हायरल

'मुरांबा' मालिकेत मोठा ट्विस्ट; अक्षय आणि रमाच्या आयुष्यात 'ती' पुन्हा येणार; प्रेक्षक मात्र संतापले

SCROLL FOR NEXT