राज्यात विजेची रेकॉर्ड ब्रेक मागणी
३० हजार ५६१ मेगावॉटची नोंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : उन्हाचा वाढता चटका आणि उकाड्यापासून सुटका व्हावी, म्हणून मुंबईकरांसह राज्यभरातील ग्राहकांकडून एसी, पंखे, कुलरचा वापर वाढला आहे. त्यामुळे मंगळवारी (ता. २५) दुपारी साडेतीन वाजता राज्यात आतपर्यंतची सर्वाधिक ३० हजार ५६१ मेगावाॅट एवढी विजेची मागणी नोंदली गेली आहे. याआधी १० मार्चला ३० हजार २२९ मेगावाॅट एवढी विजेची मागणी नोंदवली गेली होती.
राज्यात गेल्या महिनाभरापासून तापमानात चांगलीच वाढ होताना दिसत आहे. तसेच उष्णतेची लाटही जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विजेचा वापर केला जात आहे. मंगळवारी राज्याची विजेची मागणी विक्रमी टप्प्यावर पोहोचली असून, ३० हजार ५६१ मेगावाॅटपैकी तब्बल २६ हजार ९२८ मेगावाॅट राज्यभरातून महावितरणकडे, तर ३,६३४ मेगावाॅट एवढी मुंबईची मागणी नोंदवली गेली. राज्याची विक्रमी मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणने महानिर्मितीकडून सुमारे नऊ हजार ३९१ मेगावाॅट, खासगी प्रकल्पातून आठ हजार ३९१ मेगावाॅट, केंद्रीय प्रकल्प आणि एक्स्चेंमधून नऊ हजार १५४ मेगावाॅट वीज घेतली, तर मुंबईतील विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी टाटा पाॅवरने ६८३ मेगावाॅट, अदाणीकडून ३३६ मेगावाॅट आणि एक्स्चेंजमधून २,६१५ मेगावाॅट वीज घेण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.