जिल्हा परिषदेचा ७६ कोटींचा अर्थसंकल्प
गतवर्षीच्या तुलनेत ६.३६ टक्क्यांची वाढ
पालघर, ता. २५ (बातमीदार) ः पालघर जिल्हा परिषदेचा २०२४-२५चा ७१.९६ कोटींचा सुधारित, तर २०२५-२६चा ७६.५४ कोटींचा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी मंगळवारी (ता. २५) जाहीर केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात ६.३६ टक्के वाढ दर्शविण्यात आली आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात पूर्वीच्या शिलकीसह एकूण ७८.३७ कोटींचा महसूल दाखविण्यात आला आहे. त्यात सर्वाधिक ५१ टक्का वाटा हा मुद्रांक शुल्क अनुदानाचा आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी व वित्त विभागाच्या काटेकोर नियोजनामुळे सेसच्या उत्पन्नात १६ कोटींची वाढ झाली आहे. अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करताना, विविध विभागांच्या गरजा लक्षात घेऊन विविध शासकीय योजना प्रस्तावित केल्या आहेत. त्यात पायाभूत सुविधा, बेरोजगारी, दारिद्र्य निर्मूलन, कुपोषण निर्मूलनासाठी प्रयत्न करणे, शैक्षणिक विकास, आरोग्य, रोजगारनिर्मिती, कृषी, पशुसंवर्धन, पाटबंधारे विभागासाठी तरतूद करण्यात आली. अर्थसंकल्प सादरीकरणावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, प्रकल्प संचालक डॉ. रूपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, मुख्य लेखा अधिकारी धनराज पांडे यांच्यासह इतर पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
---
विभागनिहाय तरतुदी
१. जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण भागातील इमारती, रस्ते, जोडरस्ते, इतर बांधकामे व दुरुस्तीसाठी ११.५६ कोटींची तरतूद करण्यात आली.
२. पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी शासन नियमानुसार उत्पन्नाच्या २० टक्के निधी राखीव ठेवण्यात आला. त्या माध्यमातून सहा प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहेत.
३. समाजकल्याणसाठी अर्थसंकल्पामध्ये ५.७८ कोटींची तरतूद केली आहे. एकूण उत्पन्नाच्या २० टक्के निधी मागासवर्गीयांच्या विकासासाठी राखव ठेवण्यात आला आहे.
४. प्राथमिक शिक्षणासाठी ७.८५ कोटी रुपयांची तरतूद असून, मागील अर्थसंकल्पापेक्षा तीन टक्के वाढ करण्यात आली आहे.
५. पशुसंवर्धनासाठी ४.२७ कोटींची तरतूद केली आहे. त्याअंतर्गत पशुवैद्यकीय संस्थांच्या इमारतींची देखभाल-दुरुस्ती, सुशोभीकरण व विस्तारीकरण, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त, लसीकरणासाठी खर्च करण्यात येणार आहे.
६. कृषी विभागासाठी निविष्ठा, सिंचन, बियाणे, नवी पिके यासाठी ४.०८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
७. आरोग्य विभागासाठी ५.०५ कोटींची तरतूद केली असून, गतवर्षापेक्षा ३३ टक्के वाढ करण्यात आली आहे.
८. लघु पाटबंधारे विभागासाठी ४.५३ कोटींची तरतूद असून, गतवर्षापेक्षा ३३ वाढ केली आहे.
९. महिला व बालविकास विभागासाठी ३.३७ कोटींची तरतूद केली आहे. पालघर जिल्ह्यातील कुपोषणमुक्तीसाठी महिला व बालविकास विभागापुढे मोठे आव्हान आहे.
१०. दिव्यांग कल्याण विभागासाठी १.२८ कोटींची तरतूद केली आहे. दिव्यांगांना पशुपालनासाठी दुधाळ जनावरे देणे, दिव्यांग शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी शेळीपालन वा तत्सम मदत करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.