मुंबई

महिलेला १५ लाखांचा गंडा

CD

महिलेला १५ लाखांचा गंडा
‘मेडिकल’ला प्रवेश देण्याच्या बहाण्याने फसवणूक
भाईंदर, ता. २५ (बातमीदार) : वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने मिरा रोड येथील महिलेची तब्बल १५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी नयानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरा रोड येथील महिलेचा दीड वर्षांपासून मुलासाठी चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा शोध सुरू होता. ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांना आदित्य कश्यप नामक व्यक्तीचा फोन आला. त्याने विविध वैद्यकीय महाविद्यालयांची नावे आणि शुल्काची माहिती पाठवली. त्यापैकी बंगळूर येथील एम. एस. रमैय्या इन्स्टिट्यूट या महिलेला पसंत पडले. पहिल्या व दुसऱ्या वर्षासाठी एकूण २० लाख शुल्क असल्याचे सांगत कश्यपने मुलाची कागदपत्रे मागवून घेतली आणि पैशांची मागणी केली; मात्र महिलेने आम्ही थेट महाविद्यालयात पैसे भरू, असे सांगितले. त्यावर प्रवेश प्रक्रिया मी करणार असल्याने पैसे माझ्याच खात्यात पाठवा, असे सांगत बँक खाते क्रमांक पाठवले. महिलेने या खात्यावर गेल्या वर्षभरात १४ लाख ८९ हजार रुपये पाठवले. त्यानंतर कश्यपने एम. एस. रमैय्या महाविद्यालयाचे प्रवेशपत्र पाठवले आणि उर्वरित चार लाख रुपयांची मागणी केली.
----
आरोपीचा शोध सुरू
महिलेने महाविद्यालय सुरू होण्याची तारखेबाबत तसेच प्राध्यापकांशी बोलणे करून देण्याची मागणी केली असता, कश्यपने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर कश्यपने फोन स्वीकारणे बंद केले. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने नयानगर पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २४) आदित्य कश्यपविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारात भूकंप! बाजार उघडताच सेंसेक्स 1,600 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स घसरले?

T20 World Cup: आज मिळणार पहिला फायलिस्ट! दक्षिण आफ्रिका - न्यूझीलंडमध्ये ईडन गार्डन्सवर रंगणार सेमीफायनल

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर शहरालगत कंदलगाव तलाव परिसरात ९० फूट उंचीची चार झाडे तोडताना सहा जणांना पकडले

Galli Brothers : दुबईतील गलाई बांधव सुरक्षित; युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांमध्ये चिंतेचे वातावरण

Shahbaz Sharif Viral Post : 'कंडेम' लिहायच्या नादात लिहिलं 'कंडोम'! पाकिस्तानच्या पंतप्रधानांची मोठी घोडचूक; 'तो' स्क्रीनशॉट होतोय जगभर व्हायरल

SCROLL FOR NEXT