नफ्याच्या आमिषाने
युवकाने गमावले ५४ लाख
ठाणे शहर (बातमीदार) ः शेअर बाजारात गुंतवणूक करून नफ्याच्या आमिषातून वर्तकनगर येथील युवकाला ५३.४४ लाखांचा फटका बसला. अमेय गोंदकर असे या युवकाचे नाव आहे. अमेय यांना एका संकेतस्थळावर शेअर बाजारात गुंवतणुकीबाबत माहिती मिळाली. त्याबाबत शोध घेतल्यावर त्यांना गुंतवणुकीबाबत अनेक फोन येऊ लागले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अमेय यांनी १५ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत ५३.४४ लाख रुपये गुंतवली; मात्र त्यानंतर पुढील लोकांनी नफ्याचा परतावा देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे समजल्यावर अमेय यांच्या तक्रारीवरून वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.