मुंबई

उल्हासनगरकरांनो, तुमच्या तक्रारींसाठी थेट ‘जनसंवाद सभा’

CD

उल्हासनगर, ता. २७ (वार्ताहर) : ‘प्रशासन जनतेच्या दारी’ हे केवळ घोषवाक्य न राहता प्रत्यक्षात उतरवण्यासाठी उल्हासनगर महापालिका सज्ज झाली आहे. सरकारच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यातील ‘सुकर जीवनमान’ या महत्त्वाच्या घटकांतर्गत नागरिकांच्या समस्या स्थानिक स्तरावरच सोडवण्यासाठी महापालिकेने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. आता दर सोमवारी प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयात नागरिकांसाठी ‘जनसंवाद सभा’ घेण्यात येणार आहे. त्या माध्यमातून नागरिकांना आपले प्रश्न, अडचणी थेट अधिकाऱ्यांपुढे मांडण्याची संधी मिळणार आहे.

उल्हासनगर महापालिका सदस्यांची मुदत संपल्यानंतर लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीत नागरिकांच्या अडचणी आणि सुविधांना योग्य न्याय देण्यासाठी प्रशासनाने हा पुढाकार घेतला आहे. आयुक्त तथा प्रशासक मनीषा आव्हाळे यांच्या आदेशानुसार प्रत्येक सोमवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत सर्व प्रभाग समिती कार्यालयांमध्ये ही सभा आयोजित केली जाईल. प्रत्येक जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान प्रभाग समितीचे सहायक आयुक्त भूषवतील. सभेसाठी सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम, मालमत्ता कर व नगररचना विभागांचे वरिष्ठ अधिकारी हजर राहणार असून, नागरिकांनी आपल्या तक्रारी थेट या अधिकाऱ्यांसमोर मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. सभेची सुरुवात आयुक्तांनी मागील आठवड्यात घेतलेल्या निर्णयांची व सरकारच्या योजनांची माहिती देऊन केली जाईल. त्यानंतर प्रत्येक नागरिकाला वैयक्तिकरित्या बोलावून त्यांची समस्या नोंदवून घेण्यात येईल. ज्या समस्या तत्काळ मार्गी लावता येतील, त्यावर तेथेच चर्चा करून तोडगा काढण्यात येईल. अन्य समस्या नोंदवून पुढील प्रक्रिया राबवली जाईल.
हा उपक्रम केवळ कागदापुरता मर्यादित न राहता प्रभावीपणे राबवावा, यासाठी आव्हाळे यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत. सर्व सहायक आयुक्त व संबंधित विभागांनी तत्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश दिले आहेत. या उपक्रमामुळे उल्हासनगरकरांना आपल्या भागातीलच कार्यालयात जाऊन समस्या मांडता येणार आहेत.

महापालिकेचा उद्देश म्हणजे नागरिकांचे प्रश्न तत्काळ सोडवणे आणि त्यांच्याशी थेट संवाद साधणे. जनसंवाद सभांमुळे प्रशासन व नागरिकांमध्ये सुसंवाद वाढेल. स्थानिक पातळीवरच समस्यांचे समाधान होईल, हीच या उपक्रमामागची प्रमुख भावना आहे.
- मनीषा आव्हाळे, आयुक्त, उल्हासनगर महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Parishad Election : अंबादास दानवेंसाठी काँग्रेसनं घेतली माघार; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा देताना 'मविआ'मध्ये नक्की कोणती झाली 'डील'?

Artificial Mango Ripening : सावधान! तुम्ही खाल्लेला आंबा नैसर्गिक की केमिकलने पिकवलेला? 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Love Numerology : प्रेमात पक्के 420 असतात 'या' 3 मुलांकाचे लोक; तुमच्या पाठीत कधी खंजीर खुपसतील कळणारही नाही

Latest Marathi News Live Update : भाजप सर्व राज्यांमध्ये विजयी होईल- स्वाती मालीवाल

India Census 2026 : राज्यात १ मे पासून जनगणना, विचारले जाणार 'हे' प्रश्न; चुकीची माहिती दिल्यास होणार तब्बल 'इतका' दंड

SCROLL FOR NEXT