मुंबई

सिंधी नववर्षाच्या स्वागतार्थ उल्हासनगरमध्ये महाबाईक रॅली

CD

उल्हासनगर, ता. २७ (वार्ताहर) : सिंधी समाजाच्या नववर्ष ‘चेटीचंड’च्या पूर्वसंध्येला उल्हासनगरच्या रस्त्यांवर सिंधी एकतेचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. उल्हासनगर-१ येथील रिजेन्सी एंटीलिया येथून शनिवारी (ता. २९) सकाळी १० वाजता सुरू होणारी ‘महाबाईक रॅली’ उल्हासनगर-५ मधील जय झूलेलाल प्रवेशद्वार येथे समारोपास येणार आहे.

सिंधी संस्कृती, परंपरा आणि सामूहिक एकतेचे प्रतीक ठरणाऱ्या या रॅलीत शहरातील हजारो युवक, महिला, व्यापारी व सामाजिक संस्था सहभाग घेणार आहेत. शहरातील प्रत्येक चौकात उत्सवाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. रॅलीच्या सुरुवातीला एंटीलिया येथे पारंपरिक बहराणा साहेबचे पूजन होणार आहे. त्यानंतर भक्तिगीत, भजन कीर्तन व प्रसाद वितरणाची व्यवस्था असेल. साई झूलेलाल यांच्या चरणी ही श्रद्धांजली अर्पण करत संपूर्ण रॅलीत जय झूलेलालच्या घोषणांनी वातावरण भक्तिमय होणार आहे. ही रॅली सलग चौथ्या वर्षी आयोजित करण्यात येत आहे. सिंधी समाजाच्या सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक म्हणून तिच्याकडे पाहिले जाते.
यंदाची रॅली अधिक भव्य स्वरूपात पार पडणार असून, संपूर्ण मार्गावर व्यापाऱ्यांकडून पुष्पवृष्टीसह रॅलीचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. रॅलीचे आयोजन महेश सुखरामानी, भारत गंगोत्री, शंकर नागरानी, हीरो बोधा, अनिल बठिजा, सोनू विशनानी व इतर कार्यकर्त्यांनी केले आहे. या वेळी शहरातील युवक बाईकर्स, व्यापारी संघटना, डान्स क्लब्स, योगा ग्रुप्स, कराओके क्लब, सिंधी कलाकार, महिला मंडळ आणि विविध सामाजिक संस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रॅलीचा मार्ग :
रिजेन्सी एंटीलिया-बिर्ला गेट -बस स्थानक -गोल मैदान -निरंकारी हॉल -नेहरू चौक -फर्निचर बाजार -शिवाजी चौक -शास्त्री चौक सेक्शन १७ -हीरा घाट -पवई चौक -उल्हासनगर-४ मेन बाजार -शहीद हेमू कालानी चौक सेक्शन २५ -नेताजी चौक -गांधी रोड -उल्हासनगर-५ मुख्य बाजार -चालीहा साहिब -दूध नाका -जय झूलेलाल प्रवेशद्वार, कैलाश कॉलनी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Administrator : ‘गोकुळ’ प्रशासक नियुक्ती हाच अंतिम पर्याय, राजकीय मतप्रवाहात; गोकुळच्या दुधात मिठाचा खडा कोणाचा...

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसैनिक उभा करू; संपूर्ण प्रहार संघटनेसह बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश

जहाजाचे दोन मालक, एक म्हणतो पाकिस्तानला चला, दुसरा म्हणतो भारतात; अहवाल सीमाशुल्ककडे सोपवला, काय होणार?

हिंदी मालिकेत झळकणार स्टार प्रवाहची गाजलेली नायिका; साकारणार मुख्य भूमिका; तुम्ही ओळखलंत का?

Indeed AI : आता मित्र समजून ChatGPT कडे मागा नोकरी! रिमोट जॉब असो किंवा वर्क फ्रॉम होम, सगळंकाही मिळणार एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT