मुंबई

नवनियुक्त कर्मचाऱ्यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रशिक्षण

CD

नवनियुक्त कर्मचाऱ्यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रशिक्षण
अलिबाग, ता. २७ (वार्ताहर) ः रायगड जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत जिल्हा परिषदअंतर्गत नवनियुक्त कर्मचाऱ्यांचे सेवांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रशिक्षण शिबिर बुधवारी (ता. २६) जिल्हा नियोजन भवन येथे पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून नवनियुक्त कर्मचाऱ्यांना सेवा बजावताना शिस्त, अपील, वर्तणूक, वित्तीय बाबी, ई-ऑफिस, सेवापुस्तक, रजा नियम, आर्टीफिशियल इंटेलिजेंस या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
मुख्यमंत्री यांनी १०० दिवसांचा महत्त्वा‍कांक्षी उपक्रम जाहीर केला आहे. या उपक्रमांतर्गत १०० दिवसांत नागरिकांच्या सोयीसुविधा, प्रशासनातील सुधारणा या बाबींवर भर दिला जात आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे यांच्या संकल्पनेतून शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्या हस्ते करण्यात आले, तर शिबिराच्या दुसऱ्या सत्रात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी भेट दिली. या वेळी शिबिरात नवनियुक्त कर्मचाऱ्यांना मिळणारे प्रशिक्षण त्यांना सेवा बजावताना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कर्मचाऱ्यांनी सर्व शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी काम करावे, असे मार्गदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी केले. या शिबिरात शिस्त अपील, वर्तणूक या विषयावर माणगाव पंचायत समितीच्या सहाय्यक प्रशासन अधिकारी स्नेहल मोरे यांनी नवनियुक्त कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच वित्तीय बाबी या विषयावर मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, ई-ऑफिस विषयावर माहिती तंत्रज्ञान अधिकारी आयटी सेल कृष्णात उथळे, सेवापुस्तक, रजा नियम विषयावर सहाय्यक प्रशासन अधिकारी अंजली वर्तक व कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रसाद पवार, आर्टीफिशियल इंटेलिजेंस या विषयावर जिल्हा समन्वयक (आपले सरकार), जयेश म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन अमरदीप ठोंबरे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Mumbai Expressway Accident : सीएनजी लिक होऊन धावती कार पेटली; वैष्णोदेवी दर्शनाहून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

IPL 2026 : दोन मॅच, जिथे मुबंई इंडियन्सने माती खाल्ली! R Ashwin ने पोलखोल केली; म्हणाला, आता सर्व ६ सामने जिंकणे अशक्य

Latest Marathi News Live Update : राज्यभरात उष्माघाताच्या 115 रुग्णांची नोंद

CBSE Parenting Calendar 2026-27: मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नवा उपक्रम; सुजाण पालकत्वासाठी 'सीबीएसई'कडून पालकांसाठी मार्गदर्शक दिनदर्शिका जाहीर

Gold Rate Today: एप्रिलमध्ये सोनं स्थिर! आता महागणार का? खरेदीदारांनी काय करावं?

SCROLL FOR NEXT