पश्चिम रेल्वेच्या १७ एसी लोकल रद्द
तांत्रिक बिघाड; उन्हाच्या तडाख्यात प्रवाशांचे हाल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : उन्हाच्या तडाख्यात प्रवाशांसाठी दिलासा ठरणाऱ्या एसी लोकलसेवा अचानक रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. गुरुवारी (ता. २७ ) पश्चिम रेल्वेच्या १७ एसी लोकल गाड्या तांत्रिक कारणांमुळे रद्द करण्यात आल्या. रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी (ता. २८)देखील या १७ फेऱ्या रद्द राहणार असल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे.
पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट-बोरिवली आणि चर्चगेट-विरार मार्गावर धावणाऱ्या या गाड्या तांत्रिक बिघाडामुळे अचानक बंद पडल्या. उन्हाच्या तडाख्यात एसी लोकलचा पर्याय उपलब्ध नसल्याने पासधारक आणि तिकीटधारकांना गर्दीत सामान्य लोकलने प्रवास करावा लागला. त्यामुळे अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर आणि स्थानकांवर नाराजी व्यक्त केली. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एसी लोकलच्या देखभाल दुरुस्तीवेळी काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे गुरुवारच्या १७ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आणि आज (ता.२८) त्या रद्द करण्यात येणार आहेत. या फेऱ्यांच्या बदल्यात नियमित लोकलसेवा सुरळीत चालवली जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रवाशांनी व्यक्त केली नाराजी
उन्हाळ्यात प्रवाशांसाठी एसी लोकल मोठा दिलासा ठरत असताना अचानक सेवा बंद पडल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.