मुंबई

उघड्यावर कचरा जाळल्यास एक हजार रुपयांचा दंड

CD

उघड्यावर कचरा जाळल्यास
एक हजार रुपयांचा दंड

विभागवार पालिकेचे पथक; १ एप्रिलपासून अंमलबजावणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांना आता १०० रुपयांऐवजी एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. वायुप्रदूषणासह पर्यावरण आणि आरोग्याचे गंभीर धोके लक्षात घेऊन महापालिकेने दंडाच्या रकमेत दहा पटींनी वाढ केली आहे. यावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेची विभागवार पथके तैनात करण्यात येणार असून, १ एप्रिलपासून अंमलबजावणी सुरू होणार आहे.
आतापर्यंत उघड्यावर कचरा जाळताना कोणी आढळल्यास स्वच्छता उपविधी तरतुदीनुसार शंभर रुपये दंड आकारला जात होता. दंडात्मक रक्कम कमी असल्यामुळे याबाबत गांभीर्य बाळगले जात नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर दंडाची रक्कम एक हजार रुपये करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, असे उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी सांगितले.  
बृहन्मुंबई स्वच्छता आणि आरोग्य उपविधी उपनियम २००६अंतर्गत नियम ५.१० नुसार कचरा जाळण्यास मनाई आहे. अनेक भागात विशेषतः उघड्या भूखंडांवर, बांधकाम स्थळांवर आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या भागात सुकी पाने आणि मिश्र कचरा आणि इतरही साहित्य जाळलेले आढळते. अशा प्रकारे उघड्यावर कचरा जाळल्यानंतर निर्माण होणारी वायुप्रदूषणाची समस्या लक्षात घेता उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
----
पथकावर काय आहे जबाबदारी?
महापालिकेच्या प्रशासकीय विभाग (वॉर्ड) कार्यालय स्तरावर घनकचरा व्यवस्थापन विभागातील कनिष्ठ पर्यवेक्षक, उपद्रव शोधक (एनडी स्टाफ) आणि मुकादम आदींचे पथक स्थापन केले जाणार आहे. कचरा जाळण्याची शक्यता असलेल्या क्षेत्रांचे नियमित निरीक्षण आणि देखरेख करणे, उल्लंघन करणाऱ्यांना जागेवरच दंड आकारणे आणि नागरिकांत पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याचे काम हे पथक करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेत आणखी एक भारतीय वंशाची महापौर? निवडणूक रिंगणात असलेल्या नित्या रमन कोण?

Ira Jadhavने इतिहास रचला; T20 Mumbai Women’s League मध्ये ठरली सर्वात महागडी खेळाडू; भारताची पहिली त्रिशतकवीर मुलगी...

आता 'या' दुकानांचा परवाना रद्द होणार, बदलापूर नगरपालिकेचा मोठा निर्णय; नेमकं कारण काय?

Latest Marathi News Live Update : महिला आरक्षणावरून अशोक चव्हाणांचा विरोधकांवर निशाणा; निवडणुकांत पराभूत करण्याचे आवाहन

ई-सेवा केंद्र चार दिवसांपासून ठप्प, शासकीय दाखले रखडल्यामुळे पालकांची तारांबळ

SCROLL FOR NEXT