मुंबई

सुनावणीनंतर सात दिवसांत आदेश काढा

CD

सुनावणीनंतर सात दिवसांत आदेश काढा
म्हाडाच्या उपाध्यक्षांचे अधिकाऱ्यांना निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : कार्यालयीन कामकाजाच्या अनुषंगाने विविध प्रकरणांवर अपीलअंतर्गत म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात वेगवगेळ्या सुनावण्या घेतल्या जातात. त्यानुसार या सुनावणीमध्ये झालेल्या निर्णयानुसार सात दिवसांत आदेश काढावेत, असे निर्देश म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी (ता. २८) दिले आहेत.

सध्या म्हाडाच्या उपाध्यक्षांच्या दालनात विकास नियंत्रण नियमावली ३३ (७), बृहतसूची (मास्टर लिस्ट), म्हाडा संगणकीय सोडत आणि इतर विषयांवरील अपील सुनावण्या घेतल्या जातात. या सुनावण्यांवरील आदेश काढण्यासाठी एक महिना, दोन महिने किंवा त्याहून अधिक कालावधी लागत असल्याने संबंधित नागरिकांची मोठी गैरसोय होते. त्याची दखल घेत संजीव जयस्वाल यांनी सुनावणीनंतर अवघ्या सात दिवसांत आदेश काढण्याचे निर्देश दिले आहेत. हा निर्णय म्हाडाच्या विभागीय मंडळांतील मुख्य अधिकारी व इतर विभाग प्रमुखांच्या स्तरांवर घेण्यात येणाऱ्या सुनावणींकरिताही लागू करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for ICC Women’s T20 World Cup 2026 : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; सलामीला पाकिस्तानशी भिडणार, जाणून घ्या खेळाडूंची यादी अन् संपूर्ण वेळापत्रक

Kanker IED Blast: छत्तीसगडमध्ये मोठा आयईडी स्फोट! ३ जवान शहीद तर १ जखमी, कशी घडली घटना?

धक्कादायक : संघात निवड न झाल्याने १९ वर्षीय भारतीय महिला क्रिकेपटूने आयुष्य संपवले... खोलीत कोंडून घेतले अन्...

14 व्या वर्षी लग्न, सासरी सहन केला नाहक त्रास, 450 सिनेमांमध्ये काम करुनही झाला दुर्देवी अंत, कोण होती अभिनेत्री?

Latest Marathi News Live Update : नसरापूर हत्या प्रकरणावर सुप्रिया सुळे संतप्त; ‘फास्ट ट्रॅक कोर्ट, कठोर शिक्षा हवी’

SCROLL FOR NEXT