मुंबई

मुंबईसह ‘एमएमआर’च्या पायाभूत प्रकल्पांना बळ

CD

मुंबईसह ‘एमएमआर’च्या
पायाभूत प्रकल्पांना बळ
८७ टक्के रक्कम खर्च करणार; ‘एमएमआरडीए’चा ४० हजार कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा तब्बल ४० हजार १८७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला शुक्रवारी (ता. २८) मंजुरी देण्यात आली आहे. मेट्रो मार्गांचे विस्तारीकरण, नवीन बोगदे मार्ग, सागरी मार्ग, जलस्रोत विकास आणि नागरी पायाभूत सुविधांवरील खर्चासाठी अर्थसंकल्पाच्या तब्बल ८७ टक्के म्हणजे ३५ हजार १५१ कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणखी मजबूत होणार आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांकरिता जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा उभारण्यासाठीचा भरीव अर्थसंकल्प शुक्रवारी एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सादर केला. त्याला उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली. या वेळी राज्यमंत्री नगरविकास माधुरी मिसाळ उपस्थित होत्या. या अर्थसंकल्पानुसार २०२५-२६ साठी एमएमआरडीएला ३६ हजार ९३८ कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे.

प्रकल्पांसाठी तरतूद (कोटी रुपयांत)

मेट्रो प्रकल्प :
- मार्ग २ब : डी. एन. नगर-मंडाळे : २,१५५
- मार्ग ४ : वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली - ३,२४७
- मार्ग ५ : ठाणे-भिवंडी-कल्याण : १,५७९
- मार्ग ६ : स्वामी समर्थ नगर-कांजूरमार्ग : १,३०३
- मार्ग ९ : दहिसर ते मिरा-भाईंदर व ७ अ (अंधेरी ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ) : १,१८२ कोटी
- मार्ग १२ : कल्याण-तळोजा : १,५००

इतर प्रकल्प
- विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प : ५२१
- ठाणे ते बोरिवली चारपदरी भुयारी मार्ग : २,६८४
- सागरी किनारा मार्गापर्यंत भुयारी मार्ग - १,८१३
- उत्तन ते विरार सागरी किनारा प्रकल्प - २,०००
- प्रादेशिक स्तरावर जलस्रोताचा विकास : १,६४५
- ठाणे-घोडबंदर रस्त्यावरील भुयारी मार्ग : १,२००
- फाउंटन हॉटेल जंक्शन ते भाईंदरपर्यंत उन्नत मार्ग : १,०००
- के.एस.सी. नवनगर प्रकल्प : १,०००
-----------
अंदाजित उत्पन्न : ३६,९३८ कोटी रुपये
- वित्तीय तूट : ३,२४८ रुपये
-------
असा येणार निधी
- राज्य सरकारकडून दुय्यम कर्ज : २,०८२
- जमीन विक्री : ७,३४४
- कर्जाऊ रक्कम : २२,३२७
- इतर जमा : ८५६
- केंद्रीय महसूल : ३०५
- शासकीय अनुदान/विकास हक्क : १,०२४
- नागरी परिवहन (यूटीएफ) : ३,०००
-----------
खर्च
- प्रशासकीय खर्च : ३७३
- प्रकल्प देखभाल व संचालन : ६१६
- कर्मचारी वर्गास अग्रीम व कर्जे : ११
- कर्ज आणि अग्रीम : १०१
- सर्वेक्षणे/अभ्यास : ३३६
- अनुदाने : २९९
- प्रकल्प खर्च : ३५,१५१
- कर्ज परतफेड : ४८८
- व्याज व इतर शुल्क : २,८०५
----------
मुंबई महानगर प्रदेश हा महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा कणा आहे. दावोस येथे राज्याने १५.७० लाख कोटी गुंतवणुकीच्या ५४ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे. त्यापैकी एमएमआरडीएने एकट्यानेच ११ सामंजस्य करार करत ३.५० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत. त्यामुळेच एमएमआरडीएची अर्थसंकल्पी तरतूद म्हणजे राज्याच्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
-----------
मुंबई महानगर प्रदेशचा सर्वांगीण आणि गतिमान विकास ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. नव्या मेट्रो मार्गांपासून ते जलस्रोत प्रकल्पांपर्यंत सर्व क्षेत्रात समावेशक प्रगती साधणारा हा अर्थसंकल्प आहे. एमएमआरडीएच्या योजनांमुळे मुंबई जागतिक आर्थिक केंद्र म्हणून पुढे येईल.
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
-----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra HSC Result 2026 : बारावीचा निकाल आज जाहीर होणार! दुपारी 1 वाजल्यापासून 'या' अधिकृत लिंकवर पाहता येईल रिझल्ट, यंदा कोण मारणार बाजी?

RBI New Rules 2026 : क्रेडिट कार्ड, यूपीआय ते एटीएम; १ मेपासून काय बदललं? थेट खिशावर परिणाम

IPL 2026: मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्स; करो या मरो सामना, रोहित धोनी चर्चेत, पण प्रत्यक्षात कोण खेळणार? पाहा कशी असेल Playing XI

Maharashtra Weather Update : कोकणात ढगाळ तर विदर्भात विजांचा कडकडाट! मे महिन्याच्या सुरुवातीलाच वरुणराजाची एन्ट्री; काय सांगतोय IMD चा अंदाज?

Software Engineer Privacy : भाड्याच्या घरात आंघोळ करणाऱ्या 23 वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा गुप्तपणे काढला व्हिडिओ; 30 वर्षीय MBA पदवीधराचं घृणास्पद कृत्य

SCROLL FOR NEXT