मुंबई

घे भरारी उंच तू...!

CD

घे भरारी उंच तू..!
‘सकाळ वर्किंग वूमन्स’ची आज परिषद

मुंबई, ता. २८ : मराठी माणसांच्या मनात अग्रस्थानी असणाऱ्या ‘सकाळ’च्या वतीने समाजाभिमुख कार्य करणाऱ्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले जाते. अनेक महिला विविध आव्हानांशी लढा देत कुटुंबांचा सांभाळ करीत पुढची पिढी घडवत असतात. त्यातच अनेक महिला नोकरी करून आपल्या विविध जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडत यशोशिखर गाठत असतात, उंच भरारी घेत असतात. त्यांचे कर्तृत्व सर्वांना प्रेरणा देणारे असते. अशाच ‘वर्किंग वूमन्स’ची परिषद उद्या (ता. २९) होत आहे. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत काही यशस्वी महिलांशी संवादही या वेळी होणार आहे. ‘सकाळ’ची ‘वर्किंग वूमन्स’ ही परिषद महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. या परिषदेला महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त इंदुराणी जाखड, आमदार मनीषा कायंदे, मंदा म्हात्रे, ‘जेएनपीए’च्या महाप्रबंधक मनीषा जाधव, आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या संस्थापिका अध्यक्ष मीनल मोहाडीकर, वीणा वर्ल्डच्या व्यवस्थापकीय संचालिका वीणा पाटील, सामाजिक कार्यकर्त्या हृता आव्हाड, अभिनेत्री प्रिया बेर्डे, प्रार्थना बेहेरे या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. अदाणी समूह या परिषदेचे आयोजक आहेत. सोबतच बॅंकिग पार्टनर बँक ऑफ महाराष्ट्र, व्हेनू पार्टनर आयलीफ बँक्वेट, ज्वेलरी पार्टनर कलिश्क्वा, फोटोग्राफी पार्टनर तेज किरण यांचे सहकार्य लाभले आहे.


कुठे : आयलीफ बँक्वेट, वाशी, नवी मुंबई
केव्हा : सकाळी १० वाजता
कधी : शनिवार, ता. २९ मार्च २०२५
टीप : प्रवेश फक्त निमंत्रितांसाठीच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT