डिजिटल करवसुलीसाठी महापालिकेला पुरस्कार
कल्याण, ता. ३० (बातमीदार) : परिवर्तन डिजिटल माध्यमातून मालमत्ता करवसुली केल्याबद्दल कल्याण-डोंबिवली महापालिकेला १० लाखांचा पुरस्कार मिळाला आहे. ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान - २०२४-२०२५’ अंतर्गत झालेल्या या स्पर्धेत राज्यातील महापालिका स्तरावर दुसरे स्थान पटकावले आहे. गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवली महापालिकेने मालमत्ता करवसुलीसाठी अनेक प्रयत्न सुरू केले आहेत. या ऑनलाइन माध्यमातून करभरणा करण्यापासून अभय योजनेचा लाभ घेण्यापर्यंतच्या सुविधा पुरवल्या आहेत. राज्य स्तरावर चाकोरीबाहेरचे कार्य करणाऱ्या शासकीय आस्थापनांसाठी ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान - २०२४-२०२५’ ही स्पर्धा घेण्यात आली होती. यात राज्यातील महापालिका स्तरावर परिवर्तन डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मालमत्ता करवसुली केल्याबद्दल द्वितीय पारितोषिक महापालिकेला मिळाले आहे. या पारितोषिकाची रक्कम सहा लाख रुपये आहे, तर पहिला क्रमांक पिंपरी-चिंचवड महापालिकेने पटकावला आहे. त्यांना १० लाखांचे पारितोषिक मिळाले आहे. या महापालिकेलाही करवसुलीसाठी चांगले कार्य केल्याबद्दल पारितोषिक मिळाले आहे, तर तिसरे पारितोषिक चार लाखांचे असून, ते उत्तम सौंदर्यीकरणाबद्दल चंद्रपूर महापालिकेला प्राप्त झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.