मुंबई

दोन महिन्यांपासून पोकलेन पाण्याच्या गाळात

CD

दोन महिन्यांपासून पोकलेन पाण्याच्या गाळात
लाखो रुपयांच्या मशीनचे नुकसान; शिवसेनेची चौकशीची मागणी
विरार, ता. ३० (बातमीदार) : वसई (पश्चिम) येथील सनसिटी नाल्यामध्ये मागील दोन महिन्यांपासून महानगरपालिकेच्या मालकीचे पोकलेन अर्धवट रुतून बसले आहे. पन्नास लाखांपेक्षा जास्त किमतीची आणि जनतेच्या करातून विकत घेण्यात आलेली ही मशीन गेल्या दोन महिन्यांपासून ती बाहेर काढण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांना व अभियंत्यांना वेळ मिळाला नाही. याची चौकशी करून याला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेने पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याकडे केली आहे.
नालेसफाईसाठी असलेले पोकलेन नाल्याच्या पाण्यात गेल्या दोन महिन्यांपासून उभे आहे. यासाठीच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर यांनी आयुक्तांकडे या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली. याबाबत अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत. यावर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे कामे अजून सुरू झाली नाहीत. नाल्यात पाणफुटीच्या वेलीही नाहीत, तरीही हे पोकलेन कोणत्या कामासाठी त्या ठिकाणी नेण्यात आले होेते.
पोकलेन नाल्याच्या पाण्यात असल्यामुळे अनेक सवालही उपस्थित करण्यात आले आहेत. तरीही याबाबत का कारवाई केली नाही, असा उपस्थित करण्यात आला आहे.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
खातेनिहाय चौकशी करा
पालिकेचे पोकलेन मशीन अशा प्रकारे नादुरुस्त होणे हे नालेसफाई ठेकेदारांच्या पथ्यावर पडणारे आहे. ठेकेदारांना थेट फायदा व्हावा यासाठी जाणीवपूर्वक हा प्रकार घडवून आणला का, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.
तरी या गंभीर घटनेस जबाबदार आपले संबंधित विभागाचे सहाय्यक आयुक्त, उपायुक्त आणि संबंधित अभियंता यांना तत्काळ निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी प्रवीण म्हाप्रळकर यांनी आयुक्तांकडे केली आहे.
-------------------------------------
MUM25E83946

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Website: मराठी डिजिटल बातम्यांमध्ये 'सकाळ डिजिटल' नंबर १; साडे सहा कोटींहून अधिक वाचकांचा विश्वास

Hapus Mango Price Rise : हवामानामुळे 'फळांचा राजा' महागला; उत्पादनात 30 टक्क्यांनी घट, भावात 25 टक्क्यांची वाढ

Maharashtra Council Election : काँग्रेस विधानपरिषदेसाठी उमेदवार देणार नाही, अंबादास दानवेंचा मार्ग मोकळा; निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

IPL 2026: रियान परागला BCCI ने सुनावली शिक्षा! ड्रेसिंग रुममध्ये व्हॅपिंग करणं पडलं महागात

एकुलत्या एक मुलाच्या निधनानंतर आईने सोडलं ८० कोटींच्या बंगल्यावर पाणी, झोपडीत काढतेय अखेरचे दिवस

SCROLL FOR NEXT