मुंबई

रस्ते दुरुस्तीची सर्व कामे १५ मेपर्यंत पूर्ण करा

CD

रस्ते दुरुस्तीला येणार वेग
कामे १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेली रस्ते दुरुस्तीची कामे १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, एमएमआरडीए या सर्व यंत्रणांना शुक्रवारी (ता. २८) दिले. पूर्व द्रुतगती महामार्ग, कापूरबावडी जंक्शन, घोडबंदर रोड, सेवा रस्ता आणि गायमुख घाट या परिसरात सुरू असलेल्या कामांची पावसाळ्याच्या तयारीच्या दृष्टीने नुकतीच पाहणी केली. पावसाळ्याच्या तयारीसाठी ठाणे आणि महापालिकेची सर्व यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, एमएमआरडीए, महावितरण, वाहतूक पोलिसांसह संयुक्त दौरा आयोजित केला होता. या वेळी पालिका आयुक्तांनी कॅडबरी जंक्शन ते गायमुख या भागात पाहणी केली. वाहतूक कोंडीची सगळी ठिकाणे लक्षात घेत त्यावर करता येणाऱ्या उपायांबाबत चर्चा करण्यात आली.

रस्ते दुरुस्ती, काँक्रीटीकरण, गटारांची स्वच्छता, दोन उड्डाणपुलांची कामे ही सर्व कामे १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश यंत्रणांना दिले आहेत, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. त्याचबरोबर दर पंधरा दिवसांनी या कामांची पाहणी केली जाणार आहे. घोडबंदर रोडवरील समस्यांबाबत होणारी समन्वय बैठक नियमितपणे होईलच. तसेच शहरातील अंतर्गत रस्ते व्यवस्थित करून पावसाळ्यात कुठेही वाहतूक कोंडी होणार नाही किंवा पाणी साचून गैरसोय होणार नाही, हे पाहण्यास सांगितले आहे. खड्डेमुक्त ठाण्यासाठी सगळे प्रयत्नशील असल्याचेदेखील राव यांनी या वेळी सांगितले.

पूर्व द्रुतगती महामार्गावर ज्युपिटर हॉस्पिटलगतच्या सेवा रस्त्यावर सुरू असलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या कामाची पाहणी केली. त्याचबरोबर कापूरबावडी जंक्शन येथील मेट्रोचे काम, सिनेवंडर मॉल या भागात सुरू असलेल्या पेट्रोल पंप ते नळपाडा जंक्शनपर्यंत मेट्रो तसेच जलवाहिनीच्या कामाची पाहणी केली. या भागात रस्त्याची दुरुस्ती तसेच उड्डाणपुलावरील रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहेत. त्याबाबत तातडीने नियोजन करण्यास सांगितले. घोडबंदर रोड सेवा रस्ता, उड्डाणपूलच्या शेजारील सेवा रस्ते, गटारे, पातलीपाडा उड्डाणपूल जंक्शन, बटाटा कंपनी, आनंदनगर जंक्शन, कासारवडवली उड्डाणपुलाखाली रस्ता, भाईंदरपाडा उड्डाणपूल, त्याखालील रस्ता, नागला बंदर जंक्शन, गायमुख घाट परिसराची पाहणी केली.

जलवाहिनीसाठी खोदकाम
माजिवडा ते कॅडबरी जंक्शन सेवा रस्त्यावर जलवाहिनीसाठी खोदकाम केलेले आहे. ज्या भागात जलवाहिनी अंथरून झाली आहे, तिथे तातडीने रस्ता वाहतूक योग्य करावा, तसेच हे काम जलदगतीने पूर्ण करून पूर्ण सेवा रस्ता वाहतुकीस खुला करावा, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले. कापूरबावडी जंक्शन येथील मेट्रोचे काम मार्गी लागेपर्यंत अधिक वॉर्डन तैनात करावेत, अशी सूचनाही आयुक्त राव यांनी दिल्या. २० एप्रिलपर्यंत कापूरबावडी येथील पेपर कंपनीलगतचा छोटा पूल लहान वाहनांसाठी खुला केला जाईल, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

उड्डाणपुलाची मुदत
भाईंदरपाडा येथील उड्डाणपूल १५ एप्रिलपर्यंत आणि कासारवडवली येथील उड्डाणपूल १५ मेपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले. मेट्रो मार्गाखालील रस्त्यावर असलेला उंच सखलपणा पावसापूर्वी दुरुस्त करण्यात येईल, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचवेळी, कासारवडवली येथील उड्डाणपुलाच्या बाजूला असलेले महावितरणचे काम त्यांनी जलद स्थलांतरित करण्यास सांगितले.

गायमुख घाट दुरुस्ती
गायमुख घाट येथे ८०० मीटर रस्त्याची गतवर्षीप्रमाणेच दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यासाठी आयआयटीमधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra HSC Result 2026 : बारावीचा निकाल आज जाहीर होणार! दुपारी 1 वाजल्यापासून 'या' अधिकृत लिंकवर पाहता येईल रिझल्ट, यंदा कोण मारणार बाजी?

RBI New Rules 2026 : क्रेडिट कार्ड, यूपीआय ते एटीएम; १ मेपासून काय बदललं? थेट खिशावर परिणाम

IPL 2026: मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्स; करो या मरो सामना, रोहित धोनी चर्चेत, पण प्रत्यक्षात कोण खेळणार? पाहा कशी असेल Playing XI

Maharashtra Weather Update : कोकणात ढगाळ तर विदर्भात विजांचा कडकडाट! मे महिन्याच्या सुरुवातीलाच वरुणराजाची एन्ट्री; काय सांगतोय IMD चा अंदाज?

Software Engineer Privacy : भाड्याच्या घरात आंघोळ करणाऱ्या 23 वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा गुप्तपणे काढला व्हिडिओ; 30 वर्षीय MBA पदवीधराचं घृणास्पद कृत्य

SCROLL FOR NEXT