पनवेल, ता. ३० (वार्ताहर) : पनवेलमधील गराडा गाव येथे बाबुराव वाघमारे (४५) यांची गोळी झाडून हत्या करणारा आरोपी प्रभाकर जनार्दन वाघे उर्फ चिल्या (२५) याला पनवेल शहर पोलिसांनी खालापूर येथून अटक केली आहे. आरोपी चिल्या याचे बांधकामावरील कामगारासोबत भांडण झाले होते, हे भांडण सोडवण्यासाठी बाबुराव मध्ये गेल्यामुळे आरोपी प्रभाकर याने बाबुराव यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे.
मृत बाबुराव वाघमारे हे पनवेलमधील गराडा गाव येथील जनार्दन वाघे यांच्या घराच्या बांधकामाच्या ठिकाणी सेंट्रिंगचे काम करत होते. बुधवारी (ता. २६) सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास बाबुराव वाघमारे हे बांधकामाच्या ठिकाणी उपस्थित असताना, अज्ञात मारेकऱ्याने त्यांच्यावर गोळी झाडून त्यांची हत्या करून पलायन केले होते. पनवेल शहर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून गोळीबाराच्या घटनेचा सखोल तपास सुरू केला होता. या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पाच वेगवेगळी पोलिस पथके तयार करण्यात आली होती. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी व आजूबाजूच्या परिसरातील लोकांकडे चौकशी केली असता बाबुराव वाघमारे यांची हत्या प्रभाकर उर्फ चिल्या याने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी प्रभाकरचा शोध सुरू केला असता, तो खालापूर येथील अदिवासी वाडीवर लपून बसला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने खालापूर येथील आदिवासी वाडीतून आरोपी प्रभाकर उर्फ चिल्या याला अटक केली. आरोपी चिल्या यास प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची ३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे करीत आहेत.
--------------------
भांडण सोडवताना जीव गमावला
आरोपी प्रभाकर उर्फ चिल्याचे बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या कामगारासोबत भांडण झाले होते. या भांडणात बाबुराव वाघमारे हे भांडण सोडविण्यासाठी गेले होते. त्याचा राग आल्याने आरोपी प्रभाकर उर्फ चिल्या याने त्याच्याजवळ असलेल्या रायफलमधून गोळी झाडून बाबुराव वाघमारे यांची हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.